सातारा जिल्ह्यात 372 नागरिकांचे नमुने तपासणीला

सिद्धार्थ लाटकर
Sunday, 18 October 2020

याबरोबरच 372 जणांचे नमुने शनिवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 698 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. याबरोबरच 372 जणांचे नमुने शनिवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 34, कराड येथील 10, फलटण येथील 20, कोरेगाव येथील 45,  वाई येथील 21, खंडाळा येथील 20, रायगाव येथील 43, पानमळेवाडी येथील 66 नागरिकांचा समावेश आहे.

याबरोबरच महाबळेश्वर येथील 10,  दहिवडी येथील 17, खावली येथे 18,  पिंपोडा येथील 4  व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 64 असे एकूण 372 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Satara district samples of 372 citizens have been sent for investigation