
- प्रशांत घाडगे
सातारा : सौरऊर्जा ग्रामनिर्मितीची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीतजास्त गावांचा सहभाग घेऊन गावे १०० टक्के सौरऊर्जा ग्राम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या संकल्पनेतून ‘मिशन शाश्वत ग्रामपंचायत’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातून पाच गावांची निवड करण्यात आली आहे. गावे सौर ग्राम करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करून हरित ऊर्जेच्या आधारे गाव ऊर्जा स्वयंपूर्ण करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश राहणार आहे.