उंडाळ्यात मोकाट कुत्र्यांची दहशत

जगन्नाथ माळी
Thursday, 17 September 2020

उंडाळे स्टॅण्ड परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. सकाळी व्यायामाला जाणाऱ्यांसह पादचारी व प्रवाशांना या कुत्र्यांचा सामना करतच पुढे जावे लागत आहे. 

उंडाळे ः सध्या सकाळी मॉर्निंग वॉक, मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्यांना उंडाळे स्टॅण्ड परिसरात मोकाट कुत्र्यांचा सामना करावा लागत आहे. मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून होत आहे. 

सध्या सर्व बाजारपेठ सुरू झाली आहे. भाजी मार्केट सुरू आहे. त्यामुळे कऱ्हाडला मोटरसायकलवरून जाणारे प्रवासी असतात. पण, उंडाळे स्टॅण्ड परिसरात गाडी आली की त्या गाडीचा मोकाट कुत्री पाठलाग करायला सुरवात करतात. त्यामुळे मोटारसायकल चालकाच्या भीतीतून अपघात होण्याचा धोका आहे. पहाटे मॉर्निंग वॉकला जाणारे युवक, ग्रामस्थांनाही या कुत्र्यांचा सामना करत पुढे जावे लागते. त्यामुळे घरातून निघताना हातात काठी घेऊन ते स्टॅण्ड परिसरात येतात. कुत्र्यांच्या भांडणामुळे पायी चालणेही मुश्‍किल झाले आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 

संपादन ः संजय साळुंखे 
 

साताऱ्यातील जम्बो हॉस्पिटलवर शुक्लकाष्ठ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara dogs terrified in the undale village