

Satara Drought News Water Shortage Hits Farmers as Tanker Demand May Rise Despite High Dam Storage Across the District
sakal
सातारा जिल्ह्यात अकराही तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरीच्या अवघा ७९ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे पूर्ण जिल्ह्याला टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पूर्व भागातील काही मोठ्या गावांत एक दिवसाआड पाणी सोडले जात आहे. माण, खटाव व फलटण तालुक्यांतील ४५ गावे, २५४ वाड्यांना ३८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आगामी काळात टंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा तालुकानिहाय आढावा घेणारी मालिका आजपासून....