Satara Farm Fire : खटावात शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख; सीताफळाची तब्बल 2200 झाडे भस्मसात, पाच वर्षांच्या मेहनतीची झाली माती

Massive Fire Destroys Custard Apple Orchard in Satara : खटाव तालुक्यातील धारपुडी येथे लागलेल्या भीषण आगीत शेतकरी मोहन घाडगे यांची तीन एकरांवरील २२०० सीताफळ झाडांची बाग जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले.
What caused the Satara farm fire?

What caused the Satara farm fire?

esakal

Updated on

खटाव (सातारा) : येथील धारपुडी शिवारात भीषण आग लागून शेतकरी मोहन घाडगे यांची तीन एकरांवरील सीताफळाची बाग पूर्णपणे जळून खाक झाली. सुमारे २२०० झाडांची, पाच वर्षांच्या अथक परिश्रमातून उभी राहिलेली ही बाग काही क्षणांत भस्मसात (satara farm fire custard apple orchard loss) झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. कष्टाने फुलवलेली बाग काही क्षणांत राखेत परिवर्तित झाल्याने शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com