esakal | Satara: राज्य शासनाविरोधात 'बळीराजा' आक्रमक; कऱ्हाडात धरणे
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य शासनाविरोधात 'बळीराजा' आक्रमक; कऱ्हाडात धरणे

राज्य शासनाविरोधात 'बळीराजा' आक्रमक; कऱ्हाडात धरणे

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना शेतीचे उत्पादन दुप्पट करणार, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देणार या घोषणा केल्या. राज्य शासनाने नियमित कर्जदारांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र दोन वर्षानंतरही काहीच झालेले नाही. याचा निषेध नोंदवत महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन बळीराजा शेतकरी संघटनेने त्यांच्या कोल्हापुर नाक्यावरील पुतळ्यासमोर आज धरणे आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

धरणे आंदोलनात बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, आंदोलनात केंद्रीय चंद्रकांत यादव, विश्वास जाधव, सागर कांबळे, पोपट थोरात, उत्तम खबाले, इम्रान पटेल आदी पदाधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी श्री. पाटील म्हणाले, केंद्र व राज्य सरकार हे शेतकऱ्यांसाठी फसव्या घोषणा करत आहे. त्याची कोणतीही अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे जगणे मुश्किल बनले आहे.

हेही वाचा: सातारा : टाळ, मृदंगात स्वाभिमानीचे सत्याग्रह आंदोलन

केंद्र सरकारने शेतीमालाचे उत्पादन दुप्पट करुन उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याची घोषणा केली होती. राज्य सरकारने सत्तेत आल्यानंतर नियमित कर्जदारांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्याला दोन वर्षे झाली शेतकऱ्यांना दमडीचीही मदत मिळालेली नाही. नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला राज्य सरकारने पानेच पुसली आहेत. केवळ फसण्या घोषणा केंद्र व राज्य शासनाकडुन करण्यात आल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारला गांधी जयंतीदिनी तरी चांगली बुद्धी मिळावी व शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी प्रार्थना यावेळी संघटनेकडून करण्यात आली.

loading image
go to top