
सातारा: जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका पाटण, कोरेगाव, सातारा, कऱ्हाड, वाई, महाबळेश्वर तालुक्यांतील शेती पिकांना बसला आहे. पश्चिमेकडील तालुक्यात शेतीचे १०० हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या नुकसानीची पाहणी सुरू असून, पावसाचा जोर ओसरल्यानंतर पंचनामे केले जाणार आहेत. घेवडा, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तसेच बाजरी, मका, आले, हळद या पिकांना फटका बसल्याचे चित्र आहे.