

Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड : खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेतले जाते. दर वर्षी सुमारे ९३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होते. पेरणीसाठी शेतकऱ्यांना खासगी कंपन्या, बाजारपेठेतील बियाण्यांवर अवलंबून राहावे लागते. यंदा मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकत तब्बल २५ हजार ४८२ क्विंटल सोयाबीनचे बियाणे स्वतः तयार केले. त्यामुळे सोयाबीन बियाण्यांच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.