Satara : वाट चुकलेल्या बिबट्याच्या पिल्लाची अखेर झाली आईशी भेट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard in Satara

Satara : वाट चुकलेल्या बिबट्याच्या पिल्लाची अखेर झाली आईशी भेट!

साताऱ्यातल्या सज्जनगडावर काल बिबट्याचं एक पिल्लू आढळून आलं होतं. त्यामुळे या परिसरात खळबळ माजली होती. पण अखेर हे पिल्लू आणि त्याच्या आईची भेट झाल्याचं पाहायला मिळालं. बिबट्या मादीने स्वतःच तिचं पिल्लू त्यांच्या नैसर्गिक अधिवासात नेलं आहे.

सज्जनगडावर काल दुपारी तीनच्या सुमारास बिबट्याचा एक बछडा गडावर रामघळ परिसरात आढळून आला होता. त्यामुळे परिसरात खळबळ माजली होती. स्थानिकांनी या विषयीची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी तिथं दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी बछड्याची आणि मादीची भेट घडवून आणण्याचे प्रयत्न केले. या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे.

हा दीड महिन्यांचा बछडा होता. काल रात्री साडेबाराच्या सुमारास बिबट्याची मादी स्वतः या पिल्लाच्या शोधात आली होती. यानंतर ही मादी आपल्या पिल्लाला घेऊन निघून गेली. ही सगळी घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.

Web Title: Satara Female Leopard Lost Its Child Found After Forest Departments Efforts

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :LeopardSajjangad open