गुन्ह्यांसंदर्भातले खटले न भरल्याने वनपाल निलंबीत

सिद्धार्थ लाटकर
Wednesday, 16 September 2020

नियमानुसार त्यांनी दैनंदिनी सादर केली नाही.

सातारा : कामातील अनियमितता, हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मायणी (ता. खटाव) येथील वनपाल काश्मिर अब्दुल शिंदे यांना निलंबीत करण्याचे आदेश कोल्हापूरच्या मुख्य वनसंरक्षकांनी दिले आहेत.

उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा यांनी याबाबतचे आदेश पारित केला. वडूज वनपरिक्षेत्रात श्री. शिंदे हे वनपाल म्हणून कार्यरत होते.

काँग्रेस आमदारांच्या उत्तराने उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम 

वनविभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरसवाडी, गारळेवाडी, कलेढोण येथील रोपवनांमधील कामात तपासणीअंती अनियमितता आढळून आली आहे. संयुक्त वनव्यावस्थापन समितीचे हिशोबही त्यांनी दीडवर्षांत दिलेले नाहीत. नियमानुसार त्यांनी दैनंदिनी सादर केली नाही.

सरकार म्हणतं, एलआयसीचं खासगीकरण नाही; पण हे अर्धसत्यच!

दोन वन गुन्ह्यांसंदर्भात वरिष्ठांचे आदेश असुनही खटले भरले गेले नाहीत, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Forest Department Orders Kashmir Shinde Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: