esakal | सातारा: जनावरं चारण्‍यास मनाई केल्याने वनमजुरास मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा: जनावरं चारण्‍यास मनाई केल्याने वनमजुरास मारहाण

सातारा: जनावरं चारण्‍यास मनाई केल्याने वनमजुरास मारहाण

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : वन विभागाच्‍या हद्दीत जनावरे चारण्‍यास मनाई केल्‍याच्‍या रागातून शिवथर (ता. सातारा) येथे वनमजुरास मारहाण केल्‍याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात बाळकृष्‍ण वामन साबळे (रा. शिवथर) याच्‍यावर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. शिवथर (ता. सातारा) येथे तुषार रामचंद्र चव्‍हाण (वय २७) हा युवक राहण्‍यास असून, तो वन विभागात हंगामी वनमजूर म्‍हणून कामास आहे.

हेही वाचा: एफआरपी तीन तुकड्याविरोधात 'स्वाभिमानी'चे मिस्ड्‌ कॉलचे आवाहन

शिवथर येथील रेल्‍वे गेटच्‍या वरील भागास वनविभागाचे क्षेत्र असून, याठिकाणी वृक्षारोपण करण्‍यात आले आहे. या परिसरात लावलेल्‍या झाडांची देखरेख करण्‍यासाठी ता. ९ रोजी गेले होते. या वेळी त्‍यांना काही जनावरे त्‍या परिसरात चरत असल्‍याची दिसली. ती जनावरे वनविभागाच्‍या हद्दीतून बाहेर नेण्‍यास चव्‍हाण याने बाळकृष्‍ण साबळे यांना सांगितले. याचा राग आल्‍याने साबळेने चव्‍हाण यास शिवीगाळ करत दमदाटी सुरू केली.

यानंतरही चव्‍हाणने साबळेला जनावरे बाहेर नेण्‍यास सांगितले. यामुळे चिडलेल्‍या साबळेने चव्‍हाणला लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. मारहाण करतानाच साबळेने चव्‍हाण यांना जीवे मारण्‍याची धमकी दिली. याची तक्रार काल चव्‍हाण यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात नोंदवली असून, साबळेविरोधात मारहाणीचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. याचा तपास हवालदार जाधव हे करीत आहेत.

loading image
go to top