सातारा : सात तालुक्यांसाठी पाच कोटींचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधी!

सातारा सात तालुक्यांसाठी पाच कोटींचा निधी

कऱ्हाड: जिल्ह्यातील सात तालुक्यांत विविध कामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून २५१५ योजनेंतर्गत निधी मंजूर आहे. त्यात गावांतर्गत मूलभूत सुविधांची कामे मार्गी लागणार आहेत. सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, वाई, खंडाळा, खटाव, पाटण तालुक्यांचा समावेश आहे.

सातारा तालुक्यातील वर्ये, खोडद, वेणेगाव, रेवंडे, न्हाळेवाडी, साळवणे-गोवेत रस्त्याला प्रत्येकी पाच लाख, दहिवडी, घाटवणला बस थांबा शेडला चार लाख, कारी, लावंघर, वडगाव येथे स्मशानभूमीत बैठक शेडला प्रत्येकी पाच लाख, कासाणीत रस्त्याला पाच लाख, शहापूर, राऊतवाडीला गटर्ससाठी प्रत्येकी पाच लाख, वडूथला सभागृहाला १० लाख, आसगाव, आकले, पानमळेवाडीत रस्त्यासाठी प्रत्येकी सात लाख, वाढेत रस्त्याला सात लाख, वासोळेत सभामंडपाला १० लाख, कऱ्हाड तालुक्यात वसंतगड, गोटेत रस्त्याला प्रत्येकी १० लाख, मुळीकवाडी, नांदगाव, नवीन कवठेत आठ लाख, मुंढे, किवळ, चिखली, खोडशी येथे रस्त्याला प्रत्येकी सात लाख, आरेवाडी, घोणशीला रस्त्याला प्रत्येकी आठ लाख, बाबरमाची, हरपळवाडी, कोरिवळे, कोळेवाडी, वनवासमाची येथे रस्त्याला प्रत्येकी पाच लाख, कोडोली, गमेवाडीत सोलर हायमास्टला पाच लाख, हनुमानवाडी, बेलवडे बुद्रुकला गटर्सला सात लाख, म्‍होप्रे गटर्सला आठ लाख, धोंडेवाडीत सभा मंडपाला १० लाख, जखीणवाडीत सोलर हायमास्टला सात लाख असा निधी मंजूर आहे.

कोरेगाव तालुक्यातील आसगाव, भाकरवाडी, आर्वीत रस्त्याला सात लाख, सागवी, बोबडेवाडीत, वेळूत गटारच्या कामाला पाच लाख, रामुसवाडीत सभा मंडपाला सात लाख, वडाचीवाडी, सुलतानवाडी, चंचळी, नागझरी, चिमणगाव, भाटमवडीत पेव्हर ब्लॉकला प्रत्येकी पाच लाख, वाघजाईवाडी, बोरजाईवाडीत तडवळे स. कोरेगाव रस्त्याला प्रत्येकी पाच लाख, जायगावला सभा मंडपाला सात लाख, वाई तालुक्यातील वेळेत रस्त्यासाठी सात लाख, मांघरला सामाजिक सभागृहाला आठ लाख, घावडीत सांस्कृतिक भवनाला आठ लाख, पाचवडला पाच लाख, खंडाळा तालुक्यातील वाठार बुद्रुकला सांस्कृतिक भवनाला सात लाख, विंग, खेड बुद्रुकला रस्त्यासाठी प्रत्येकी

सात लाख, शिंदेवाडी, अतिट, म्‍हावशी, लोहोमला रस्त्यासाठी प्रत्येकी पाच लाख निधी, खटाव तालुक्यात रहाटणी भानसेवाडीत सभागृहाला सात लाख, दरूज, मांजरेवाडी व आमलेवाडीत रस्त्यासाठी प्रत्येकी पाच लाख,

पाटण तालुक्यात मारुल हवेलीत हायमास्टला १० लाख, भोसगावला सभामंडपाला १० लाख, सुळेवाडी, नारळवाडी, गलमेवाडी, असवलेवाडीत रस्त्याला पाच लाख, सणबूरला संरक्षण भिंतीला पाच लाखांचा निधी मंजूर आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सहकार्य केले आहे.