esakal | बाप्पांचे स्वागत साधेपणाने; पण दणक्‍यातच होणार!
sakal

बोलून बातमी शोधा

बाप्पांचे स्वागत साधेपणाने; पण दणक्‍यातच होणार!

शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर काहीशी बंधने घातली आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून एक गाव एक गणपती, एक पालिका एक गणपती साजरा करावा, असे आवाहन केले आहे. त्यास जिल्ह्यातील मंडळांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 

बाप्पांचे स्वागत साधेपणाने; पण दणक्‍यातच होणार!

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : गणेश चतुर्थी म्हणजे गणरायाचा विराजमान होण्याचा दिवस; पण विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या चैतन्यदायी, मंगलदायी आणि निसर्गप्रिय आनंदयात्रेला उद्या शनिवार (ता. 22) पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. तसा तो दरवर्षीच येतो. काही दिवस का होईना; पण आपले दु:ख, व्यथा व वेदना बाजूला ठेवून प्रत्येक जण नव्या उत्साहाने आणि जोमाने गणेशोत्सवासाठी तयारीला लागतात. म्हणून प्रत्येक वर्षी त्याच्या येण्याचा उत्साह ओसंडून वाहतो. हा उत्साह भाविकांमध्येही भिनला आहे. त्याच सळसळत्या उत्साहाची प्रचिती सर्वत्र दिसून येत आहे. मात्र, कोरोना सावटाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवावर काहीशा मर्यादा आल्या आहेत. परंतु, लाडक्‍या गणेशाचे स्वागत घरोघरी तेवढ्याच उत्साहात होणार असून शहरासह ग्रामीण भागात जोरदार तयारी सुरू आहे. मिरवणुकांना बंदी असल्याने वाद्यांचा गजर अन्‌ गर्दीही असणार नाही, पण साधेपणाने का होईना गणेशोत्सव दणक्‍यातच होणार आहे. 

यावर्षी नागरिकांना सर्वच सण कोरोना प्रसाराच्या भीतीने साधेपणाने साजरे करावे लागले आहेत. शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर काहीशी बंधने घातली आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून `एक गाव एक गणपती, एक पालिका एक गणपती साजरा करावा, असे आवाहन केले आहे. त्यास जिल्ह्यातील मंडळांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवावर मर्यादा असल्यातरी नागरिकांचा उत्साह काही कमी नाही. घरोघरी सजावटीची कामे जोरात सुरू आहेत. 

आता कडुनिंब पळविणार कोरोनाला? कसे ते वाचा

सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुले घरीच आहेत. तसेच अनेक कारखाने, उद्योग, कार्यालयेही अद्याप सुरू झाली नसल्याने अनेक कर्ती मंडळीही घरीच आहेत. त्यामुळे घरगुती सजावटीसाठी मनुष्यबळ आणि वेळही बऱ्यापैकी मिळाला आहे. त्यामुळे घरातील स्वच्छता, रंगरंगोटी, सजावटीची कामे वेगाने सुरू आहेत. बालचमू आपापल्या परीने छोटे देखावेही करत आहेत. प्रशासनाने शिथीलता दिल्याने सजावटीचे साहित्यही उपलब्ध झाले असून खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; जाणून घ्या नेमकं कारण 

दरम्यान, गणेश मूर्ती खरेदीसाठी स्टॉल आणि कुंभारवाड्यात गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी आज शुक्रवार (ता. 21) पासूनच मूर्ती घरी नेण्यास सुरवात केली आहे. उद्या शनिवारी (ता. 22) गणेशाचे आगमन झाल्यानंतर मंगळवारी (ता. 25) गौरीचे आगमन होणार आहे. गौरीपुढे फराळाचे पदार्थ ठेवण्यासाठी महिलांची पदार्थ करण्याची धांदल सुरू आहे. घरोघरी हा उत्साह पाहता, कोरोनाचे सावट असले तरी गणेशाच्या स्वागतात कोणतीही कमी राहणार नाही. यावर्षी मिरवणुकांना बंदी असल्याने वाद्यांचा गजर अन् गर्दीही असणार नाही, पण साधेपणाने का होईना गणेशोत्सव दणक्‍यातच साजरा होणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top