सातारा : अध्यक्ष... बाप्पांचा उत्सव जवळ आलाय, हे वाचा

बाळकृष्ण मधाळे
Wednesday, 12 August 2020

कन्टेंटमेंट झोनमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सक्त मनाई असेल. कन्टेंटमेंट झोनमधील व्यक्तींना गणेशोत्सवामध्ये सहभागी होता येणार नाही. तसेच गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांनी आरोग्य सेतू अॅप वापरणे बंधनकारक राहील. आहे. या उत्सवकाळात गणेश मंडळांनी त्यांच्या मंडळास भेटी दिलेल्या व्यक्तींची नावे, मोबाईल क्रमांक, पत्ता व आरोग्य सेतू अॅप इत्यादी बाबतची नोंद ठेवणे बंधनकारक आहे.

सातारा : कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. तसेच गणेशाेत्सव साजरा करताना गर्दी हाेणार नाही याची काळजी मंडळांनी घ्यावी. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी पोलिस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थेची पूर्वपरवानगी घ्यावी. पुर्व परवानगीशिवाय उत्सव साजरा करु नये.
कृष्णाकाठी हेवेदावे मिटले... 
 
कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, मर्यादित स्वरुपाचे मंडप उभाराण्यात यावा, या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती, तसेच सार्वजनिक गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारची भपकेबाजी नसावी. कोणत्याही प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, देखावे, प्रदर्शने इत्यादी आयोजित करु नयेत.

परप्रांतीयांना न्याय, कोकणावर अन्याय! विशेष रेल्वे गाड्यांचा मुद्दा जाणार 'राज' दरबारी!

श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता चार फूट व घरगुती गणपती फुटांच्या मर्यादेत असावी, यावर्षी शक्‍यतो पारंपरिक गणेश मूर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे, मूर्ती शाडूची अथवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्‍य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. तसेच उत्सवाकरिता वर्गणी देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, परंतु घरोघरी जाऊन वर्गणी मागू नये अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.

ब्रेकिंग न्यूज : साताऱ्यातील सिव्हिलला मिळाला कारभारी, डॉ. गडीकरांचे काय झाले वाचा 

त्याचबरोबर उत्सव काळात नागरिक आकर्षित होऊन गर्दी होवू नये, याकरिता कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीच्या प्रदर्शन करु नये. दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी सामाजिक अंतर राखून आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरांस प्राधान्य द्यावे. आरती, भजन, कीर्तन याबराेबरच अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. या धार्मिक कार्यक्रमांना पाच पेक्षा जास्त व्यक्तींना कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच मंडप परिसरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; ऑनलाइन पद्धतीचा सातारा जिल्ह्यात प्रथमच प्रयाेग

या उत्सवकाऴात श्रीगणेश दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुकद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था केली जावी. प्रत्यक्ष दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे फिजिकल डिस्टन्सींग, तसेच स्वच्छतेच्या नियमाबाबत पालन व्हावे. तसेच दिवसातून तीन वेळा मंडप परिसर सॅनिटायझेशन करावा. त्याचबरोबर श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुकांस सक्त मनाई असेल. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जनास्थळी जाणे टाळावे. दरम्यान, सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक स्वतंत्रपणे एकत्रितरित्या काढण्यास सक्त मनाई आहे.

पाटणमध्ये लेकीनं गावकऱ्यांसाठी साकारल्या गणेशमूर्ती

कन्टेंटमेंट झोनमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सक्त मनाई असेल. कन्टेंटमेंट झोनमधील व्यक्तींना गणेशोत्सवामध्ये सहभागी होता येणार नाही. तसेच गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांनी आरोग्य सेतू अॅप वापरणे बंधनकारक राहील. आहे. या उत्सवकाळात गणेश मंडळांनी त्यांच्या मंडळास भेटी दिलेल्या व्यक्तींची नावे, मोबाईल क्रमांक, पत्ता व आरोग्य सेतू अॅप इत्यादी बाबतची नोंद ठेवणे बंधनकारक आहे.

Video : बाळा.. गेलेला माणूस परत येत नसतो, खंबीर बनून आईला सावर 

दरम्यान, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, तसेच मिरवणूक, अन्नदान, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमातून होणाऱ्या गर्दीला टाळण्याकरिता सदरच्या बाबींना पूर्णतः मनाई असेल. या कालावधीमध्ये गणेश मंडळाबाहेर फुलांचे हार, नारळ, मिठाई, प्रसाद इत्यादी दुकाने लावण्यास मनाई राहील, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Ganeshotsav To Be Celebreated In Simple Way