
सातारा : साताऱ्यात होणारे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीचे उद्दिष्ट पार करायचे आहे. साताऱ्याचे मावळे या उद्दिष्टामध्ये कधीही कमी पडणार नाहीत. संमेलनाच्या यशस्वितेसाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचे आहे. त्यामुळे सातारकरांनी ९९ व ९९९ या निधी संकलनाला पाठिंबा द्यावा. तन- मन- धन अर्पण करून साहित्य संमेलनाच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले.