
सातारा : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये चार कॅबिनेट मंत्रिपदे मिळवत सातारा जिल्हा राज्यात आघाडीवर राहिला. आमदार शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे व मकरंद पाटील यांनी आज सायंकाळी नागपूरमध्ये झालेल्या सोहळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.