
साताऱ्यातील युवकाला सात वर्षे सक्तमजुरी
सातारा : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी युवकाला विशेष जिल्हा न्यायाधीश ए. के. पटणी यांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सागर बलभीम कांबळे (वय २४, रा. लक्ष्मी टेकडी, सातारा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, दोघे पळून जाऊन लग्न करू, नाही तर माझ्या जिवाचे बरे-वाईट करून घेईन,’ असे म्हणून सागरने एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते.
त्यानंतर बीड जिल्ह्यात नेऊन एका घरातील देव्हाऱ्यासमोर मुलीला कुंकू लावून व गळ्यात मंगळसूत्र घालून त्याने लग्न केले. आता आपण नवरा-बायको आहे, असे म्हणून त्याने मुलीच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
न्यायाधीश ए. के. पटणी यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील एन. डी. मुके यांचा युक्तिवाद व साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायाधीश पटणी यांनी सागरला ७ वर्षे सक्तमजुरी, तीन हजार रुपये दंड व दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकारी वकिलांना पैरवी अधिकारी सहायक फौजदार अविनाश पवार, हवालदार अजित फरांदे यांनी, तर प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, हवालदार शमशुद्दीन शेख, जी. एच. फरांदे, राजेंद्र कुंभार, अश्विनी घोरपडे, अमित भरते, मणेर, शेख यांनी सहकार्य केले.
Web Title: Satara Girl Atrocity Lure Of Marriage Police Case Filed Against Youth
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..