esakal | सातारा : जिल्ह्याला 827 कोटींचा निधी द्या ;केंद्रीय पथकाकडे केली मागणी.
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

सातारा : जिल्ह्याला 827 कोटींचा निधी द्या ;केंद्रीय पथकाकडे केली मागणी.

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोयनानगर : सातारा (Satara) जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. जिल्हात झालेले नुकसान भरुन येण्यासाठी केंद्राकडून 827.33 कोंटी रुपयाचा निधी तातडीने मिळावा, अशी मागणी जिल्हाधिकारी शेखर सिंह (Shekhar Singh) यांनी सोमवारी केंद्रीय पथकाकडे केली.

केंद्रीय पथकाने कोयना विभागातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरस्थितीमधील नुकसानीची पाहणी आज केली. कोयनानगर येथील मराठी शाळेत दोन महिन्यापासुन स्थलांतरीत केलेले मिरगाव गावाच्या आपत्तीग्रस्तांची भेट घेवुन त्यांची विचारपुस केली. त्यानंतर मिरगाव, हुंबरळी, नवजातील ओझर्डे धबधब्याची व शेतीची पाहणी केली. त्यानंतर कोयना प्रकल्पाच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी सिंह यांनी जिल्ह्याच्या नुकसानीचा आढावा दिला. केंद्रीय समितीचे प्रमूख रवनिशकुमार, महिंद्र सहारे, पुजा जैन, देवेंद्र चाफेकर, प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार योगेश्वर टोम्पे, रमेश पाटील, विवेक जाधव, गटविकास आधिकारी मिना साळुंखे ,सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकात माळी, कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, कार्यकारी उपअभियंता अजित पाटील,तलाठी रमेश टिपुगडे आदी उपस्थीत होते.

हेही वाचा: निलंबित आमदारांबाबत बैठकीत चर्चा नाही

बैठकीत जिल्हाधिकारी सिंह यांनी रेकॉर्डब्रेक पावसाने जिल्ह्याचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यातील पाटण व महाबळेश्वर या तालुक्यात नुकसानीची मोठी आकडेवारी आहे. एनडीआरएफने या आपत्तीत चांगले काम केले. सार्वजनीक मालमत्तेचे व शेतीचे झालेले नुकसान मोठे आहे. भूस्खलनात 48 लोकांचे जीव गेले. राज्य शासनाने तातडीने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत दिली. केंद्र शासनाने मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. जिल्ह्यासाठी केंद्राकडुन 827.33 कोंटी रुपयाचा निधी तातडीने मिळावा, अशी मागणी केली

loading image
go to top