
शाहूनगर : गोडोली (ता. सातारा) येथे झालेल्या ग्रामसभेत श्री भैरवनाथाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर सव्वा महिना मांसाहार न करण्याच्या निर्णयाबरोबर विधवा प्रथाबंदीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. गोडोली येथे श्री भैरवनाथ मंदिराचा हेमाडपंती स्वरूपात दगडी बांधकामात जीर्णोद्धार सुरू आहे.