सातारा : शासनाच्या कर्जमाफीमुळे पतसंस्थांना वसुलीसाठी डोकेदुखी

काटवलीतील दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेच्या वार्षिक सभेत चर्चा व शासनाच्या निर्णयाविरोधात ठरवाबाबत मागणी
सातारा : शासनाच्या कर्जमाफीमुळे पतसंस्थांना वसुलीसाठी डोकेदुखी
sakal
Updated on

भिलार : शासनाच्या कर्जमाफीचा फायदा थकबाकी दाराना होत आहे त्यामुळे नियमित कर्जदार सध्या सभ्रमात आहे त्यामुळे या शासनाच्या या फसव्या कर्जमाफी घोषणांचा तोटा सहकारी पतसंस्थांना बसत असून या पतसंस्थांचे कर्जदार आपणाला माफी होईल या आशेने कर्ज भरत नाहीत त्यामुळे शासनाच्या निषधाचा ठराव करावा अशी मागणी श्रीपतराव रांजणे यांनी केली.

सातारा : शासनाच्या कर्जमाफीमुळे पतसंस्थांना वसुलीसाठी डोकेदुखी
कऱ्हाडात विवाहितेचा गळा चिरुन निर्घृण खून; पोलीस घटनास्थळी दाखल

दापवडी ( ता. जावली) येथील दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या ठरावासाठी रांजणे यांनी यांनी आग्रह धरला. यावेळी संस्थेचे संस्थापक स. म. बेलोशे (गुरुजी) , संचालक तुकाराम घाडगे, संस्थेचे अध्यक्ष विजय रांजणे, उपाध्यक्ष आनंदा सपकाळ, लेखा परीक्षक गणेश पोफळे, विकास अधिकारी नारायण जाधव, संचालक गोपाळ बेलोशे, हरिश्चंद्र गावडे, अशोक बेलोशे, शिवराम पवार, बाबुराव रांजणे, गंगाराम रांजणे ,तसेच भीमराव रांजणे, अंकुश बेलोशे, हरिभाऊ गोळे तसेच सभासद उपस्थित होते.

यावेळी कोविड काळात ही अडचणीतून संस्थेच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदारांना भेटवस्तू देवून यावेळी गौरवण्यात आले. ताळेबंद वाचन व्यवस्थापक अनिल रांजणे यांनी केले. यावेळी शंकर रांजणे, शामराव रांजणे, अजित बेलोशे, रामदास गलगले, सुनीता राजपुरे तसेच सर्व सभासद उपस्थिती होते.

यावेळी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तर अडचणीच्या कोविड काळात ही सभासदांना लाभांश देणारी कळंबे महाराज ही पतसंस्था तालुक्यात एकमेव संस्था असल्याचे यावेळी गणेश पोफळे यांनी सांगितले. प्रास्ताविक अनिल रांजणे यांनी केले. स्वागत विजय रांजणे यांनी केले. सूत्रसंचालन गोपाळ बेलोशे यांनी केले तर बाबुराव रांजणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Cannot Speak or Walk, Yet Shivprasad Achieves 66% in SSC and Inspires Many
Virmade Fata on Pune-Bengaluru Highway Becomes Accident-Prone Zone
Government to Verify All E-Peek Entries Under Revised Transparency Rules
Simplicity and Memories: Mahadev Jankar Shares Emotional Moments with Shepherds
Marathi News Esakal
www.esakal.com