कऱ्हाडात विवाहितेचा गळा चिरुन निर्घृण खून; पोलीस घटनास्थळी दाखल

Karad
Karadesakal
Updated on
Summary

गेल्या दीड महिन्यात कऱ्हाड शहर परिसरात खुनांची मालिका सुरू आहे.

कऱ्हाड (सातारा) : गेल्या दीड महिन्यात कऱ्हाड शहर परिसरात खुनांची मालिका सुरू असून, कऱ्हाडच्या वाखाण परिसरात 32 वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. उज्वला ठाणेकर (वय 32, रा. वाखाण परिसर) असे या महिलेचं नाव आहे.

आज सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेनं परिसरात खळबळ उडालीय. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वाखाण परिसरात महिलेचा खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजित पाटील, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Karad
आमच्या देशात कोरोना फिरकलाच नाही

याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही तपासण्यात येत आहेत. दरम्यान, सदर गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Cannot Speak or Walk, Yet Shivprasad Achieves 66% in SSC and Inspires Many
Virmade Fata on Pune-Bengaluru Highway Becomes Accident-Prone Zone
Government to Verify All E-Peek Entries Under Revised Transparency Rules
Simplicity and Memories: Mahadev Jankar Shares Emotional Moments with Shepherds
Marathi News Esakal
www.esakal.com