धरणाचे अतिरिक्त पाणी माण खटावला द्या, एक सप्टेंबरपासून सांगलीला साेडा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

धरणाचे अतिरिक्त पाणी माण खटावला द्या, एक सप्टेंबरपासून सांगलीला साेडा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील
Updated on

सातारा : सातारा व सांगली जिल्ह्यातील सिंचन विभागांनी आपापसात समन्वय ठेवून प्रकल्पीय तरतुदीनुसार सातारा व सांगली जिल्ह्यातील कालव्यांना योग्य वेळी पाणी सोडावे, कोणत्याही लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
आधुनिक यंत्रयुगाचा 'या' व्यावसायिकांना फटका 

कालवा सल्लागार समितीची बैठक आज (शुक्रवार) पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सांगलीचे खासदार संजय पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सातार सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, सांगली सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. मिसाळ, कालवा सल्लागार समितीचे सदस्य अरुण लाड यांच्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते. 

Video : बाळा.. गेलेला माणूस परत येत नसतो, खंबीर बनून आईला सावर

धरणाचे अतिरिक्त पाणी नदीत सोडण्या ऐवजी माण खटावकडे सोडण्यात यावे. त्या पाण्याची गणना त्यांना ठरवून दिलेल्या कोट्यामध्ये करु नये, एक सप्टेंबरपासून ठरवून दिल्याप्रमाणे सांगलीसाठी आवर्तन सुरु करावे. तसेच सातारा तालुक्यातील रखडलेल्या सिंचनाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे. दोन तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे, यापुढे असाच पाऊस होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

या संघटनेने केला 150 कोरोना योद्‌ध्यांचा सन्मान 

सातारा, सांगली जिल्ह्यातील कुठल्याही लाभ धारक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशा प्रकारे आवर्तनाचे नियोजन करावे. प्रकल्पीय तरतुदीनुसार कोट्यानुसार प्रत्येक भागाला पाणी दिले जावे, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शेवटी सांगितले.

प्रसंगी पाण्यात बुडून मरू; परंतु घर सोडणार नाही; मराठवाडी धरणग्रस्तांची भुमिका

धरणग्रस्तांची पुनर्वसन ठिकाणीही परवड कायम, वाचा वहागावकरांची व्यथा... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com