'महाविकास'ची काेणावरही दडपशाही नाही; 'हैदोस'चा अर्थ चंद्रकांतदादांनीच स्पष्ट करावा : बाळासाहेब पाटील

सिद्धार्थ लाटकर
Tuesday, 17 November 2020

मतदारसंघामध्ये जास्तीतजास्त मतदान होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. विचारांना साथ देऊन पदवीधर व शिक्षकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन कार्यकर्त्यांनी बाळासाहेब पाटील यांनी मेळाव्यात केले.

सातारा  : भाजपच्या मेळाव्यात महाविकास आघाडी सरकारने हौदोस मांडला आहे, असा उल्लेख प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच केला होता. त्यावर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी "हैदोस म्हणजे काय याचा अर्थ चंद्रकांतदादांनीच स्पष्ट केला पाहिजे असे उत्तर दिले आहे. 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच बैठक झाली. बैठकीस राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृह राज्यमंत्री (शहर) सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, राष्ट्रवादी सोशल मीडियाचे प्रमुख सारंग पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, माजी आमदार प्रभाकर घार्गे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील, "पदवीधर'चे उमेदवार अरुण लाड, जयंत आजगावकर, उदयसिंह पाटील, मनोहर शिंदे, राजेंद्र शेलार, ऍड. दत्तात्रय धनावडे उपस्थित होते.

VIDEO : पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर समाधी मंदिर भाविकांसाठी खुले

यावेळी भाजपच्या मेळाव्यात महाविकास आघाडी सरकारने हौदोस मांडला आहे, असा उल्लेख प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर मेळाव्यानंतर पालकमंत्र्यांनी माध्यमांशी बाेलताना त्यावर प्रतिक्रिया दिली. "हैदोस म्हणजे काय याचा अर्थ चंद्रकांतदादांनीच स्पष्ट केला पाहिजे. तो काय असतो, हे त्यांनाच अधिक माहित असावे.'' सरकारने कोणतेही आंदोलन थांबवलेले नाही, कोणत्याही घटकावर दडपशाही होत नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान मतदारसंघामध्ये जास्तीतजास्त मतदान होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. विचारांना साथ देऊन पदवीधर व शिक्षकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन कार्यकर्त्यांनी बाळासाहेब पाटील यांनी मेळाव्यात केले.

Diwali Festival 2020 एक दिवा शहीद सैनिक, बळीराजा आणि कोविड योद्ध्यांसाठी!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Guardian Minister Balasaheb Patil Criticised Chandrakant Dada Patil Satara News