esakal | Video : महाविकास आघाडीच्या 'या' मंत्र्याला मुंबईला हलविले, तत्पूर्वी काय म्हणाले वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Video : महाविकास आघाडीच्या 'या' मंत्र्याला मुंबईला हलविले, तत्पूर्वी काय म्हणाले वाचा

मंत्री पाटील यांच्या कुटुंबियांशी आराेग्य मंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर पाटील यांना उच्च रक्तदाब आणि मुधमेहाचा त्रास असल्याची माहिती पुढे आली. वैद्यकीय अधिकारी आणि कुटुंबियांच्या चर्चेअंती मंत्री पाटील यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Video : महाविकास आघाडीच्या 'या' मंत्र्याला मुंबईला हलविले, तत्पूर्वी काय म्हणाले वाचा

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : राज्याचे सहकार मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास कृष्णा रुग्णालयातून उपचारासाठी मुंबईला रवाना झाले. मंत्री पाटील यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह असल्याने कुटुंबियांबराेबरच राज्याच्या आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचा निर्णय साेमवारी (ता.17) घेतला हाेता.
कऱ्हाड पालिकेने करुन दाखवलं 

मंत्री पाटील यांना 14 आॅगस्टला काेराेनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले हाेते. त्यामुळे ते स्वातंत्र्यदिना दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच अन्य काेणत्याही शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु हाेते. साेमवारी (ता.17) आराेग्यमंत्री राजेश टाेपे, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी मंत्री पाटील यांच्या तब्येतीची कृष्णा रुग्णालयात जाऊन चाैकशी केली.

नववधू दोन लाखांसह पळाली, पुण्यासह साेलापूर जिल्ह्यातील आठ जणांना अटक

मंत्री पाटील यांच्या कुटुंबियांशी आराेग्य मंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर पाटील यांना उच्च रक्तदाब आणि मुधमेहाचा त्रास असल्याची माहिती पुढे आली. वैद्यकीय अधिकारी आणि कुटुंबियांच्या चर्चेअंती मंत्री पाटील यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

बेशिस्तपणातून मानगुटीवर बसला कोरोना; या गावातील बाजारपेठ बंद

आराेग्यमंत्री टाेपे यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली. आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास मंत्री पाटील हे मुंबईस रवाना झाले. त्यापुर्वी त्यांनी व्हिडिआेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले जगात आणि देशात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या राेगाेवर अद्याप नियंत्रण मिळविता आलेले नाही. काही दिवसांपुर्वी मला अॅसिडेटीचा त्रास झाला. त्यानंतर मी कृष्णा रुग्णालयात दाखल झालाे. येथील वैद्यकीय अधिकारी यांनी माझ्यावर उपचार सुरु केले. माझी उत्तम काळजी घेतली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस इन ऍक्‍शन, रेमडिसिव्हर इंजेक्‍शन चोरीचे कोणास इंफेक्‍शन?  

राज्याचे आराेग्य मंत्री राजेश टाेपे यांचा साेमवारी (ता.17) सांगली दाैरा हाेता. त्यानंतर ते मला येथे भेटायला आले असता त्यांनी मला मुंबईला उपचार घेण्याची विनंती केली. खरं तर माझी तब्येत आता उत्तम आहे परंतु वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानूसार आणि मंत्री यांच्या टाेपेंच्या विनंतीनूसार मी मुंबईला रवाना हाेत आहे. काेराेना टाळण्यासाठी जनतेने साेशल डिस्टंटस पाळावे,  मास्क वापरावा, हॅन्डग्लाेज वापरा, स्वच्छता ठेवा असा संदेश मंत्री पाटील यांना दिला.

सहकारमंत्र्यांच्या तब्येती विषयी आरोग्यमंत्री म्हणाले...
 

loading image