सातारा : पावसाचा जोर वाढला अकरा गावांचे स्थलांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rai

सातारा : पावसाचा जोर वाढला अकरा गावांचे स्थलांतर

सातारा : जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून, गेल्या दोन वर्षांचा भूस्खलनाचा अनुभव लक्षात घेता प्रशासनाने जिल्ह्यातील अकरा गावांतील ३२६ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी तात्पुरते स्थलांतर केले आहे. पावसाचा जोर वाढू लागल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. यात पाटण, महाबळेश्वर तालुक्यातील गावांचा समावेश आहे. सध्या मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून, धोक्याची पातळीजवळ पोचू लागली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

एक महिना उशिरा मॉन्सून पाऊस सुरू झाला. मात्र, सध्या सुरू असलेल्या संततधार पावसाने पश्चिमेकडील तालुक्यात दरड कोसळणे, भूस्खलन, नद्यांना आलेला पूर या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. हवामान विभागाने आणखी दोन-चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सध्या कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील कोयना, कृष्णा, केरा नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. या नद्यांची पाण्याची पातळी धोका पातळीजवळ आली आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील दोन व कऱ्हाड तालुक्यातील महत्त्वाच्या दोन पुलांना पाणी लागून वाहत आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरड प्रवण, भूस्खलन होण्याचा धोका असलेल्या गावांतील लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. आतापर्यंत अकरा गावांतील ३२६ कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर केले आहे. यात १३५३ नागरिकांचा समावेश आहे. त्यांच्या निवाऱ्याच्या ठिकाणी शासनाकडून आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. कृष्णा, कोयना नद्या ओसंडून वाहू लागल्याने महत्त्वाच्या पुलांच्या धोका पातळीजवळ पाणीपातळी पोचली आहे. त्यामुळे प्रशासनाने अधिक सतर्क राहून जवळच्या गावांसह कुटुंबांचे स्थलांतर करण्याची तयारी

केली आहे. पावसाचे प्रमाण वाढू लागल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. पाटण, महाबळेश्वर तालुक्यांतील अकरा गावांतील ३२६ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी तात्पुरते स्थलांतर केल्याचे प्रशासनाने सांगितले.

Web Title: Satara Heavy Rains Prone Villages

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SatararainFarmerSakal