वरकुटे मलवडीत दिसली खाकी वर्दीतील माणुसकी

man
man
Updated on

म्हसवड (जि. सातारा) : वादळी वारा व पावसाने झोपडीवरील प्लॅस्टिकचा कागद फाटून गेल्यामुळे उघड्यावर पडलेलेल्या घिसाडी समाजातील कुटुंबाच्या मदतीस अखेर म्हसवड पोलिस ठाण्याचे कर्मचारी अभिजित भादुगले धावून गेले. स्वखर्चाने प्लॅस्टिक कागद खरेदी करून त्यांनी उघड्यावर पडलेल्या कुटुंबाच्या झोपडीवर कागद झाकून खाकी वर्दीतील माणुसकी दाखवून दिली. 

शेतकरी बांधवांना शेती कामासाठी उपयोगी पडणारी खुरपी, खोरे, कुऱ्हाड, कुदळ, टिकाव इत्यादी साधनांची दुरुस्ती करण्याचा व्यवसाय करणारे व कामे संपताच या गावातून त्या गावात अशी नियमित भटकंती करणारे घिसाडी समाजातील कुटुंब म्हसवडपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावरील वरकुटे-मलवडीत मुक्कामी आले होते. या गावातील रसत्यालगत प्लॅस्टिक कागदाने आच्छादन केलेली झोपडी उभारून त्यापुढेच त्यांनी शेती अवजारे दुरुस्तीची कामे सुरू केली होती. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे निवाऱ्यासाठी उभारलेल्या झोपडीवरील कागद फाटून गेला. परिणामी पावसातच या कुटुंबास दिवसा उन्हात व रात्रीच्या पावसात राहण्याची वेळ आली. त्यांच्या तंबूची झालेली दयनीय अवस्था पोलिस पाटलांच्या निदर्शनास पडली. 

म्हसवड पोलिस ठाण्यात सेवेत असलेले अभिजित भादुले यांना पोलिस पाटलांनी फोन करून या कुटुंबाची वादळी वारा व पावसामुळे झालेल्या दुरवस्थाची माहिती दिली. या कुटुंबास काही मदत मिळेल का, याबाबतची विचारणा केली असता श्री. भादुगले यांनी "मी काही तरी व्यवस्था करून देतो,' असे सांगितले. त्यानंतर त्यांनी तत्काळ स्वखर्चाने कागद घेऊन स्वतः पोलिस ठाण्यातील त्यांचे सहकारी कर्मचारी नितीन धुमाळ यांना सोबतीस घेऊन वरकुटे-मलवडी येथे दाखल झाले व झोपडीवर कागद टाकून कुटुंबाला सुरक्षित केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Youth Pratik Kalbhor Dies After 46 Days Following Serious Bengaluru Highway Accident During Medical Treatment
Satara Native Celebrates Ganesh Festival in Nigeria Lagos for 16 Years Keeping Marathi Culture and Ganpati Tradition Alive
Rain Deficit Damages Kharif Crops in Satara Man Khatav and Other Talukas Look to Crop Insurance for Compensation
Farmer Loss Assessment
Marathi News Esakal
www.esakal.com