ब्रेकिंग : वाईतील पेटकर कॉलनीत माेठी चाेरी; महिला गंभीर जखमी

ब्रेकिंग : वाईतील पेटकर कॉलनीत माेठी चाेरी; महिला गंभीर जखमी
Updated on

वाई : तीन अज्ञात चोरटयांनी येथील पेटकर कॉलनीतील एका घरात घसून सु-याचा धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा अंदाजे अडीज ते तीन लाखाचा ऐवज लंपास केला. आज (मंगळवार) मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी चोरटयाने चाकूचा वार केल्याने एक महिला गंभीर जखमी झाली.
 
गौरी सुर्यकांत वंजारी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. रविवार पेठेतील पेटकर कॉलनीत सर्वानंद नगरमध्ये त्या पती व दोन मुलासमवेत राहतात. त्यांचे पती हॉटेल श्रीयश येथे सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत. रोज रात्री दहा वाजता ते कामावर जातात. दुमजली असलेल्या या घराच्या वरच्या मजल्यावर थोरले दीर कुटुंबियासह राहण्यास आहेत. त्यांना जाण्या - येण्यासाठी घराच्या बाहेरुन जिना असून ते रोज रात्री दहा वाजण्याच्या पुढे आमच्या घराला बाहेरुन कुलुप लावत असतात. साेमवारी रात्री नेहमीप्रमाणे एकत्रित जेवण केल्यानंतर दहा वाजता पती कामावर निघुन गेले. त्यानंतर लहान मुलगा श्रीराज यांच्यासमवेत झोपी गेले. यावेळी दाराला आतुन कडी लावण्यास विसरले.

रात्री दोनच्या सुमारास अचानक जाग आली. त्यावेळी डोक्याजवळ साडेपाच फुट उंचीचा, काळा सावळा व सडपातळ बांधा असलेला एक तरूण उभा असलेला दिसला. त्याने गळ्यातील सोन्याचे गंठन व कानातील दागिने काढण्यास सांगितले. त्याला अचानक पाहुन मी जोरात ओरडले. त्यावेळी त्याने हातातील चाकून डाव्या हाताचे कोपराजवळ जोरात वार केला. त्यामुळे जखम होऊन त्यातून रक्त येवू लागले. त्याने ओरडलीस तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्या भितीपोटी गळ्यातील व कानातील दागिने काढुन दिले. त्यावेळी त्याचे सोबतचा दुसरा इसम पायाजवळ उभा होता. तर तिसरा घराचे दारात उभा होता. त्यानंतर तरूणाने कपाटाची चावी मागितली, परंतू चावी माझ्याकडे नाही असे म्हणताच त्याने हातातील चाकुसारख्या हत्याराने कपाट उघडले व त्यातील लॉकरमधील दीड तोळ्याचे गंठण, सात ग्रँमची सोन्याची चेन, नऊ ग्रँमचा नेकलेस, तीन ग्रँमची अंगठी, एक तोळयाचे कानातील कर्णफुले, अडीच गँमच्या लहान बाळी व बदाम, चांदीचे पैजण, लहान मुलाचा चांदीचा कंबरपट्टा, 12 हजार रुपये रोख रक्कम, व मोबाईल असा ऐवज चोरून नेला. 

घराचे बाहेरील दरवाजाला असलेले कुलुप तोडुन चोरटयांनी आत प्रवेश करुन सु-याचा धाक दाखवून व कपाट तोडून सुमारे अडीच ते तीन लाखाचा ऐवज चोरून नेला. चोरटे अंदाजे 25 ते 30 वर्षे वयोगटातील, सडपातळ बांधा असलेले आणि अंगात राखाडी व काळ्या रंगाचा टिशर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेले होते. त्यांनी तोंडास रुमाल बांधला होता. ही चोरी करण्यापूर्वी चोरटयांनी लगतचे एक कुलुप बंद मोकळे घर फोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे समजते. या जबरी चोरीच्या तपासासाठी ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वान पथक लगतच्या शेतात जावून घुटमळले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रसन्न जराड व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसराचा शोध घेतला त्यावेळी लगतच्या ओढयात चोरटयांनी टाकलेली लेडीज पर्स मिळाली. पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मोतेकर व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.

काॅंग्रेस एकनिष्ठ आमदार भाजपच्या गोटात ?

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com