सातारा : स्वच्छ सर्वेक्षणात पाचगणी पालिकेचा देशपातळीवर गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

सातारा : स्वच्छ सर्वेक्षणात पाचगणी पालिकेचा देशपातळीवर गौरव

भिलार : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण आणि कचरामुक्त शहरे या सर्वेक्षणात पाचगणी पालिकेला देशपातळीवर जाहीर झालेला पुरस्कार आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पांचगणी नगरीच्या नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कऱ्हाडकर मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, स्वच्छता निरीक्षक गणेश कासुर्डे , सुरेश मडके यांना हा पुरस्कार देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविद आणि युनियन मिनिस्टर हरदिप सिंग पुरी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पाचगणी शहरात घरगुती कचरा हा विलागिकरण केला जातो. ओला, सुका, घातक आणि प्लास्टिक तसेच घातक व सॅनिटरी कचरा, ई कचरा विलगीकृत घेतला जातो. कचरा विलागिकरणाचे प्रमाण हे 100 टक्के आहे. शहरातील नागरिक हे स्वत:ही घरचे घरी किचन वेस्ट पासून खत तयार करतात. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपरिषदेमार्फत घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेला ओला व सुका कचरा 100 टक्के संकलित केला जातो.

हेही वाचा: संतापजनक..आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; झोपलेली असताना पिशव्या पेटवून फेकल्‍या अंगावर

याचबरोबर प्लॉस्टिक बंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी करताना नागरिकांना पुर्नवापर योग्य कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील जुन्या कचऱ्यावर 100 टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. नगरपरिषदेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. तसेच शासनाच्या ‘हरित ब्रॅण्ड’ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे पांचगणी पालिकेला स्वच्छतेत ४८५०.७५ पॉइंट रँकिंग मिळाल्याने ती देशात अव्वल ठरली आहे.

satara

satara

हेही वाचा: ठाण्यात ११ हजार पिशव्या रक्तसंकलन

या पुरस्काराबद्दल नगराध्यक्षा सौ लक्ष्मी कऱ्हाडकर आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर ,पालिकेचे सर्व कर्मचारी आणि पांचगणी कर नागरिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यानंतर बोलताना नगराध्यक्षा सौ कऱ्हाडकर म्हणाल्या हा पुरस्कार पांचगणी पालिकेच्या सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मेहनतीचे फळ आहे. सर्वांनी मनात घेतल्यानेच आपण इथपर्यंत मजल मारू शकलो असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top