अबब!...सातारा जिल्ह्यात आढळले 40 किलाेचे अजगर; प्राणिमित्रांनी वाचवला जीव

अबब!...सातारा जिल्ह्यात आढळले 40 किलाेचे अजगर; प्राणिमित्रांनी वाचवला जीव
Updated on

महाबळेश्वर : प्रतापगड भागामध्ये तब्बल 12 फूट लांबीचा अजगर जखमी अवस्थेत आढळून आला. वन विभागाने प्राणिमित्रांच्या सहकार्याने या अजगरास पकडले. अजगरावर उपचार करणार असून, त्याला पुन्हा जंगलामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.
 
वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने या परिसराला भेट देऊन पाहणी केली. जंगलामध्ये जखमी अवस्थेत अजगर आढळून आला. या अजगराच्या पाठीवर जखमा झाल्या होत्या. वनरक्षक रोहित लोहार, आशिष पाटील, लहू राऊत, दीपक सोरट, महादेव कट्टे, वनमजूर वागदरे, तसेच सह्याद्री प्रोटेक्‍टर्सचे संदेश भिसे, शुभम टेके आदींनी या अजगारास पकडले व सुरक्षितरित्या हिरडा विश्रामगृह येथे उपचारांसाठी आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयसिंग सिसोदिया, डॉ. संदीप आरडे यांनी त्याच्यावर उपचार केले. 

अजगराची लांबी तब्बल बारा फूट आहे. मादी जातीचे या अजगराचे वजन चाळीस किलोहून अधिक असून, अंदाजे सात ते आठ वर्षे वय आहे. त्याच्यावर उपचार करून पुन्हा जंगलामध्ये सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली.

दहावीनंतर काय? विनामुल्य वेबिनारचे आयोजन  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mumbai-Pune Highway Traffic News
Sambhar and Fawn Captured on Camera
Karad flyover Pune Bengaluru highway
Maharashtra Sugarcane Crushing Season Raju Shetti Opposes October 15 Start Announces Hubballi Farmers Protest
Marathi News Esakal
www.esakal.com