सातारा : महाबळेश्वरहून वाईला येणारी जीप कालव्यात कोसळली; तीन जण गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा : महाबळेश्वरहून वाईला येणारी जीप कालव्यात कोसळली; तीन जण गंभीर जखमी

सातारा : महाबळेश्वरहून वाईला येणारी जीप कालव्यात कोसळली; तीन जण गंभीर जखमी

वाई (सातारा) : महाबळेश्वरहुन वाई ला येणाऱ्या जीपने दुचाकीला व रस्त्याने चालणाऱ्या महिलेला धडक देऊन धोम धरणाच्या उजव्या कालव्याच्या कठड्याला धडकून कालव्यात कोसळली.या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले.

आज दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान महाबळेश्वरहुन वाईला येणारी जीप क्रमांक (एम एच ११ए के ८२१५) किसन वीर महाविद्यालयाच्या पुढे उतारावरून भरधाव वेगात येत असताना या जीपने एका दुचाकीला मागून धडक दिली. यानंतर रस्त्याच्या कडेने पादचारी महिलेलाही ठोकरले. नंतर ही जीप धोम उजव्या कालव्याच्या कठड्याला धडकून कालव्यात पडली.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

यामुळे या अपघातात दुचाकीचालक नागेश शंकर कोष्टी (रा. सोनजाईनगर, वाई, दुचाकी चालक) व पादचारी महिला कोमल अमोल माने (वय 23 रा. फुलेवाडी, कोल्हापूर) व जीप चालक इस्माईल अब्दुल महाबळे (वय ६५ वर्षे रा. नाकिंदा, महाबळेश्वर) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी कालव्यातून जीप बाहेर काढून पोलीस ठाण्यात लावली आहे. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. मात्र हा अपघात झाला तेव्हा या परिसरात गर्दी कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.जीपमध्ये एकटा चालकच होता.अन्यथा पाण्याने भरून वाहणाऱ्या कालव्यामुळे मोठा अनर्थ घडला असता. पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी वायदंडे अधिक तपास करत आहे.

Web Title: Satara Jeep Coming Mahabaleshwar Wai Crashed Into Canal Three Seriously Injured

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sataraaccidentwai