Satara : पोलिस असल्याचे सांगून दागिन्‍यांवर डल्‍ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold

Satara : पोलिस असल्याचे सांगून दागिन्‍यांवर डल्‍ला

सातारा : येथील तांदूळ आळीत वृद्धेस अडवत पोलिस असल्‍याची बतावणी करणाऱ्या तिघांनी एक लाख ४० हजारांचे सोन्‍याचे दागिने लांबवले. पोलिस असल्‍याची बतावणी करणाऱ्यांनी दागिने घातले, तर पाच हजार रुपये दंड होईल, अशी भीती त्‍या वृद्धेस घातली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात निर्मला तानाजी नवले (रा. गुरुवार पेठ, सातारा) यांनी फिर्याद नोंदवली असून, तीन अज्ञातांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

येथील गुरुवार पेठेत निर्मला तानाजी नवले (वय ७०) या राहण्‍यास आहेत. त्‍या ता. १ रोजी कामानिमित्त मोती चौकातील तांदूळ आळी परिसरात आल्‍या होत्‍या. येथील दुकानातून खरेदी केल्‍यानंतर त्‍या चालत निघाल्‍या होत्‍या. या वेळी त्‍यांच्‍यासोबत एक जण होता. सोबत असणाऱ्यांसमवेत निर्मला नवले या चालत निघाल्‍या असतानाच त्‍यांना पाठीमागून आलेल्‍या एकाने हाक मारून थांबवले. त्‍याने आम्‍ही मंडईपासून तुमचा पाठलाग करतोय, हाका मारतोय. आमची पोलिस गाडी खाली थांबलीय, तुम्‍हाला साहेबांनी बोलावलय, असे म्‍हणत सोबत येण्‍यास सांगितले. यानुसार निर्मला नवले या निघाल्‍या असतानाच त्‍याठिकाणी आणखी दोघे आले. त्‍याने निर्मला नवले यांना घाबरू नका, आम्‍ही पोलिस आहोत. दागिने घालून फिरू नका. पाच हजार दंड आहे, असे आमच्‍या साहेबांनी सांगितले आहे.

तुम्‍ही गळ्यातील दागिने आधी काढा, असे त्‍यांना सांगितले. यानुसार नवले यांनी दागिने काढण्‍यास सुरुवात केली. या वेळी संशयितांनी एक कागद पुढे केला. यात दागिने बांधून देतो, असे म्‍हणत त्‍यांनी निर्मला नवले यांचे एक लाख ४० हजारांचे सोन्‍याचे दागिने बांधण्‍याचा बहाणा केला. पुडी त्‍यांच्‍या हातात देत आता इथे उघडू नका, घरी जाऊन उघडा, असे सांगत ते तिघे त्‍याठिकाणाहून निघून गेले.

संशय आल्‍याने नवले यांनी पुडी उघडली असता, त्‍यात दगड असल्‍याचे दिसले. फसवणूक झाल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर निर्मला नवले यांनी याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात नोंदवली. यानुसार तिघांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला असून, तपास सहायक फौजदार गायकवाड हे करीत आहेत.

Web Title: Satara Jewelers Attacked Claiming Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..