कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, राज्य महासंघ शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांच्या कार्यपद्धतीवर नाराज

सलीम आत्तार
Friday, 4 September 2020

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार आहेत.

पुसेगाव (जि. सातारा) : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केलेल्या मागण्या शासन जाणीवपूर्वक मान्य करत नसून शिक्षकांमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. महासंघाच्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी या वर्षी शिक्षक दिन हा काळा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महासंघाचे सचिव प्रा. एन. टी. निकम यांनी दिली. दरम्यान, शिक्षक दिनी निदर्शने करण्यात येणार आहेत.
पात्रताधारक प्राध्यापक का करणार पदवी जलाओ आंदोलन ?...वाचा सविस्तर
 
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना महासंघाने विविध प्रलंबित मागण्यांचे पत्रे देऊन चर्चेसाठी वारंवार विनंती केली होती. ता. 26 ऑगस्ट रोजीच्या पत्रानुसार दोन दिवसांत बैठकीचे आमंत्रण न दिल्यास महासंघ आंदोलन करेल, अशी सूचना दिली होती. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्यांबाबत राज्य महासंघाला न बोलवता शासनाने बैठक घेतली. महासंघाच्या निवेदनानंतर शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्वतः प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासंबंधी ता. 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत आश्वासन दिले; परंतु या संदर्भात अद्यापही कुठलाही निर्णय शासनाने घेतला नाही.

आईनेच दिली मुलाच्या खुनाची सुपारी; दोघांना अटक 

या उलट शिक्षकांचे संघटन असलेल्या राज्य महासंघाला विश्वासात न घेता काही शिक्षकांचा गट किंवा हातांच्या बोटावर मोजता येतील ऐवढे सभासद असलेल्या नवीन संघटनाशी मंत्री चर्चा करून महासंघाला डावलत आहेत, असा प्रकार राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व त्यांचा राज्य महासंघ कदापिही सहन करून घेणार नाही. 

आता सॅनिटरी नॅपकिन मिळणार फक्त पाच रुपयांत!

शिक्षकांच्या समस्या, प्रश्न यांचे निराकरण न करता शिक्षक वर्गात फूट पाडून शासन राजकारण करत आहे. याबद्दल शिक्षक वर्गात सरकार विषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. याचा निषेध करून यंदाचा शिक्षक दिन हा काळा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्धार राज्यासह जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी घेतला आहे.

ऑक्‍सिजन मशिनसाठी विंगच्या युवाशक्तीची एकजूट, ज्येष्ठांचा हातभार 
 
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून काही मोजके शिक्षक त्या त्या तालुक्‍यातील तहसीलदार, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 ते 1 या दरम्यान जाऊन निदर्शने करून निवेदन देणार आहेत, असे जिल्हाध्यक्ष आर. एस. शिंदे यांनी सांगितले.

सांगलीतील कुटुंबाचा खून करणारा जावळीतील युवक जेरबंद 

भिवा भदाणेचा तेरावा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Junior College Teachers Agitation On Teachers Day Education Minister Varsha Gaikwad