New Political Equation in Karad Cooperative Politics
esakal
कराड : सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडच्या राजकारणाला गेली पाच दशके आकार देणाऱ्या भोसले-उंडाळकर गटांच्या राजकीय संघर्षाला आता नवी किनार मिळाली (Karad politics) आहे. तब्बल एका तपानंतर ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि आमदार डॉ. अतुल भोसले हे एकाच राजकीय पटलावर एकत्र आले. सहकाराचे राजकारण करणाऱ्या भोसले-उंडाळकर गटांच्या नव्या राजकीय समीकरणाचे दर्शन जिल्हा बँकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने घडले. कृष्णा कारखाना निवडणुकीनंतर सहकाराच्या राजकारणात एकत्रित वाटचालीचा घेतलेला निर्णय आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्यक्षात उतरल्याने कऱ्हाडच्या राजकीय वर्तुळात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.