कऱ्हाड : गणेशोत्सव यंदा साधेपणाने; कोरोना संसर्गाची भीती

Satara
Satara
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : आगामी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, यासाठी पालिका आराखडा आखत आहे. त्यासाठी शहरामधील 300 हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे, मूर्ती कारागीर आणि मूर्ती विकणाऱ्यांनाही विश्वासात घेतले जाणार आहे. कमी उंचीची मूर्ती, झगमगाट टाळून साधेपणाने मंडळांनी आरास कराव्यात, गर्दी टाळण्यासाठी पालिकांच्या नियमांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालिकेकडून संबंधितांना देण्यात येणार आहेत. 

शहर परिसरात गणेशोत्सवाची वेगळी ओळख आहे. परिसरात तब्बल 300 हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांतून उत्सव साजरा केला जातो. त्यामध्ये गणेश मंडळांच्या मूर्तींची उंची मोठी असते. काही मंडळांच्या आरास मोठ्या असतात, काही मंडळांच्या शाही मिरवणुका असतात. अनेक मंडळे गणेशोत्सवातील दहा दिवसांत वेगवेगळे कार्यक्रम साजरे करतात. त्यामुळे गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल नेहमीच असते. आता त्या सगळ्याला फाटा दिला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन पालिकेकडून केले जाणार आहे. त्यासाठी शहरातील मूर्ती कारागीर, मूर्तीचे व्यावसायिक, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना विश्वासात घेऊन पालिका साधेपणाने उत्सव साजरा करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी सगळ्यांची स्वतंत्रपणे व्यापक बैठक घेवून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. 

दरम्यान, पेन, पनवेलसह बाहेरील राज्य व जिल्ह्यातील मूर्ती आणून विकणाऱ्यांचीही स्वतंत्र बैठक घेऊन त्यांनाही काही महत्त्वाच्या सूचना केल्या जणार आहेत. त्यांनी मूर्ती आणताना काय नियम पाळावेत, त्या विक्री करताना काय करावे, याबाबतची मार्गदर्शक सूचीही पालिका तयार करणार आहे. त्यामुळे मूर्ती विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचीही पालिका बैठक घेणार आहे. 


...यावर देणार पालिका भर 

  •  मूर्तीकारांनी कमी उंचीच्या गणेशमूर्ती कराव्यात 
  • गणेश मंडळांची बैठक घेऊन त्यांच्याही सूचना घेणार 
  • सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे करू नयेत 
  • मंडळ अथवा गणेशोत्सवात गर्दी होईल, असे कार्यक्रम टाळावेत 
  • मूर्ती कारागिरांसह व्यावसायिकांनाही घेणार विश्वासात 
  • गणेश मूर्ती नेताना व विर्सजनावेळी सोशल डिस्टन्स पाळण्याचा आग्रह 
  • आरास उभी करताना मंडळांनी त्याचा आकारही लहान ठेवावा 


""सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवतो आहे. त्या पार्श्वभूमीवर सगळेच सण साधेपणाने साजरे केले आहेत. त्याप्रमाणे येणारा गणेशोत्सवही साधेपणाने साजरा करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी आराखडा करण्याचे काम सुरू आहे. पालिकेने त्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. पालिका गणेश मंडळे, मूर्तीकार, मूर्ती व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांना विश्वासात घेऊन उत्सव साजरा करण्याचा आराखडा तयार करणार आहे. त्यासाठी सगळ्यांच्याच मदतीची नितांत गरज आहे.'' 

-विजय वाटेगावकर, 
नियोजन सभापती, कऱ्हाड  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com