माजी नगरसेवकांच्या मनधरणीसाठी नेत्यांची 'फिल्डिंग'

त्यांनी शहराच्या अनेक मोठ्या निर्णयात सहभाग नोंदवला आहे. शहरातील क्रांतीकारक बदलाचेही ते साक्षीदार आहे.
karhad
karhadsakal

कऱ्हाड : शहराच्या विकासात ज्यांनी तीन तीन दशकांपासून आपला सक्रीय सहभाग नोंदवला. कधी काळी कऱ्हाडच्या राजकारणात त्यांचा शब्द प्रमाण असायचा, अशा माजी नगरसेवकांनाही आता पालिकेतील राजकारणात वेगळी किंमत आली आहे, ती त्यांच्या संघटनेमुळेच. माजी नगरसवेकांनी संघटनेच्या रूपाने बांधलेली मोट पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर महत्वाची ठरली आहे. वास्तिवक सर्वपक्षीय, आघाड्यांचे माजी नगरसवेक अलीप्तपणे संघटनेत कार्यरत आहेत, मात्र त्यांची ती ताकद आपल्याकडे वळविण्यासह संघटनेच्या बाजूने कौल लावण्यासाठी अनेकांनी फिल्डींग लावली आहे.

त्या संघटनेत आपल्याच विचाराचे लोक त्यात आहे, काळजी नसावी, असा सल्ला प्रत्येक आघाडीतील प्रत्येकजण खासगीत देत आहे. त्यामुळे अशा मध्यस्थी करणारे काही राजकीय लोक आपलीच पोळू भाजताना दिसताहेत.

त्यांनी शहराच्या अनेक मोठ्या निर्णयात सहभाग नोंदवला आहे. शहरातील क्रांतीकारक बदलाचेही ते साक्षीदार आहे. पालिकेत तीन दशकापेक्षाही जास्त काळ ज्यांचा शब्द प्रमाण होता, अशा माजी नगरसेवकांना काही कारणाने राजकारणापासून बाजूला रहावे लागले, नवख्यांनी केलेल्या पराभवामुळेही काही माजी नगरसवेक खचून राजकारणापासून बाजूला गेले.

karhad
यवतमाळ : 'फल्ड लाईट’ने लखलखणार नेहरू स्टेडीयम

काहींनी राजकीय निवृत्ती स्विकारली, काही पराभव सहन न झाल्याने राजकारणापासून अलीप्त राहिले, अशा एक ना अनेक कारणानाने शहरात १०० पेक्षाही जास्त माजी नगरसवेक आहेत. त्या सगळ्यांना एका छताखाली आणण्यासाठी वर्षभरापूर्वी प्रयत्न सुरू झाले. बघता बघता त्यांची माजी नगरसवेक संघटनेची स्थापनाही झाली. राजकारणातील अनेक ज्येष्ठांनी त्या संघटनेला बळ दिले. बघता बघता त्या संघटनेचा पसार वाढला. त्यांचे कार्यक्रम होवू लागले. संघटनेतर्फे अनेक समापयोगी गोष्टी होवू लागल्या. अेक निवेदने दिली जावू लागली. धरणे आंदोलनाचा इशारा देत काही मागण्या करण्यास सुरवात केली. कोरोना काळात सक्रीय झालेल्या संघटनेने शहराचे लक्ष वेधले. कर माफीसाठीही माजी नगरसवेक संघटना आक्रमक झाली. या संघटनेमुळे अनेक माजी नगरसवेक सध्या तरी चार्ज आहेत. त्यांचा पुन्हा समजाकराणातील, राजकारणातील व विशेष करून पालिकेतही वावर, सहभाग वाढल्याचे दिसते.

karhad
वाकी-वरकुटेत अवैध वाळूसाठा जप्त; प्रांताधिकाऱ्यांकडून कारवाई

माजी नगरसवेकांचा वाढता प्रभाव आता पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर चर्चेचा ठरला आहे. नेमक्या काय भुमिका घ्यायची हा नंतरचा प्रश्न असला तरी किमान पक्षी ही संघटना आपल्या बाजूने असावी, आपल्या विरोधात नसावी, यासाठी आघाड्यांकडून त्यांच्याशी संपर्क वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी विशिष्ठ माजी नगरसवेकांशी पालिकेतील नेते संपर्कात आहेत. त्यांच्याशी सल्लामसलतही करताहेत, त्यामुले आगामी काळात त्याला अधिक गती येणार आहे.

गेट टू गेदरसाठीही...

स्थानिक आघाड्यांचे गटनेते, पक्षपतोदही माजी नगरसवेकांच्या संपर्कात राहून गेट टुगेदर घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे पालिकेच्या राजकारणापासून काही वर्षे अलीप्त असलेल्या मात्र शहरातील अेक गोष्टीेचे, बदलांचे साक्षीदार असलेल्या माजी नगरसवेकांच्या संघटनेलाही आता किंमत आली आहे. त्यासाठी होणारी मनधरणी आता विशिष्ठ टप्प्यात आल्याने त्याची चर्चा जोरात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com