esakal | काशीळ झाले ई- ग्राम; ऍपद्वारे होता येणार ग्रामसभेत सहभागी
sakal

बोलून बातमी शोधा

काशीळ झाले ई- ग्राम; ऍपद्वारे होता येणार ग्रामसभेत सहभागी

दैनिक सकाळ-ऍग्रोवनने तयार केलेले ई-ग्राम ऍप गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच पारदर्शक कारभारासाठी उपयुक्त आहे. या ऍपमुळे सर्वांच्याच वेळेची बचत होणार असून, समस्या सुटण्यास मदत होणार आहे. गावातील शेतकऱ्यांना हे ऍप उपयुक्त असल्याचे मत काशीळचे सरपंच सुभाषराव जाधव यांनी व्यक्त केले.

काशीळ झाले ई- ग्राम; ऍपद्वारे होता येणार ग्रामसभेत सहभागी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काशीळ (जि.सातारा) ः कोरोनामुळे सर्वच कामे ऑनलाइन झाली आहेत. हेच संकट ओळखून काशीळ ग्रामपंचायतीने ई- ग्राम मोबाईल ऍप घेतले आहे. या ऍपमुळे गावातील सर्व माहिती एका क्‍लिकवर मिळण्याबरोबर विविध करांचा थेट भराणा, तसेच ग्रामसभेत ऑनलाइन सहभागी होता येणार आहे. या ऍपमुळे गावाचा एकूण कारभार पारदर्शक होण्यासही मदत होणार आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी  ऍग्रोवन ई ग्राम ऍप
 
कृष्णा- उरमोडी नदीच्या संगमावर काशीळ गाव वसलेले असून, गावात मोठ्या प्रमाणात बागायत शेती केली जाते. या गावाचा कारभार पारदर्शक होण्यासाठी, तसेच गावातील विकासासाठी प्रत्येकाचे योगदान मिळण्यासाठी दैनिक सकाळ- ऍग्रोवनने तयार केलेल्या ई-ग्राम मोबाईल ऍपचा वापर नुकताच सुरू केला आहे. या ऍपमुळे गावतील सर्व माहिती सर्व ग्रामस्थांना एका क्‍लिकवर मिळू लागली आहे, तसेच गावातील पदाधिकारी, राबवत असलेले उपक्रम, विकासकामांची माहिती मिळणार आहे, तसेच घरपट्टी, पाणीपट्टी, आरोग्य आदी करांचा भरणा ऑनलाइन करता येणार आहे, तसेच ग्रामपंचायतीकडून देण्यात येणारे विविध प्रकारचे दाखलेही ग्रामस्थांना ऑनलाईन मिळणार आहेत. यामुळे ग्रामस्थाच्या वेळेची, तसेच आर्थिक बचत होणार आहे. या ऍपवर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, वैद्यकीय अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध असल्याने अडअडचणींना फायदेशीर ठरणार आहेत, तसेच ग्रामस्थांना या ऍपद्वारे आपल्या तक्रारी नोंदवता येणार असून, तक्रारदारांचे नाव गोपनीय राहणार आहे. यातून तक्रारदारांच्या वेळेची बचत काही सेकंदात समस्या संबंधितांना समजणार आहे. काशीळ ग्रामपंचायतीने हे ऍप घेतल्यामुळे गावाचा कारभार ऑनलाइन होणार असून, गावाच्या विकासातही सर्वांना योगदान देता येणार आहे.

""दैनिक सकाळ-ऍग्रोवनने तयार केलेले ई-ग्राम ऍप गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच पारदर्शक कारभारासाठी उपयुक्त आहे. या ऍपमुळे सर्वांच्याच वेळेची बचत होणार असून, समस्या सुटण्यास मदत होणार आहे. गावातील शेतकऱ्यांना हे ऍप उपयुक्त असून, सर्व शेतमालाचे बाजारभाव उपलब्ध आहेत.'' 
- सुभाषराव जाधव, सरंपच, काशीळ 


""ई-ग्राम ऍप हे ग्रामपंचायत कामकाजाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. ग्रामस्थांना विविध प्रकारचे कर थेट भरणे शक्‍य असल्याने सर्वांचाच वेळ आणि परिश्रम कमी होत आहेत, तसेच तक्रारी थेट करता येत असल्याने निराकरण करणे शक्‍य होणार आहे.'' 
- रमेश गायकवाड, ग्रामविकास अधिकारी, काशीळ 
 


ऑनलाइन ग्रामसभा घेता येणार 

कोरोनाचे संकट अजून किती दिवस राहील हे सांगता येत नाही. यामुळे कोरोनाबरोबर काम करण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर हे ऍप फायदेशीर होणार आहे. या ऍपद्वारे ग्रामस्थांना आपल्या समस्यांच्या तक्रारी करता येणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग न राखल्या जाण्याच्या भीतीने सध्या ग्रामसभा घेतल्या जात नाहीत. मात्र, या ऍपद्वारे ऑनलाइन ग्रामसभा घेता येणार असून, एकाच वेळी गावातील सर्व ग्रामस्थांना सभेत सहभागी होता येणार आहे. यामुळे गावातील जास्तीतजास्त लोक सहभागी होऊन गावच्या विकासासाठी प्रत्येकांची मदत होणार आहे. 

ई- ग्राम ऍपचे फायदे 

 •  या ऍपमुळे शेतकऱ्यांना राज्यभरातील सर्व बाजारपेठेतील शेतमालाचे दर मिळतात 
 •  गावातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक माहिती एका क्‍लिकवर मिळणार 
 •  केंद्र व राज्य सरकारच्या योजनाची माहिती मिळणार 
 •  हवामान सर्व अपडेट व अलर्ट मिळणार 
 •  गावात सुरू असलेल्या कामांची माहिती मिळणार 
 •  दैनिक ऍग्रोवनमधील बातम्यांचे अपडेट दिले जातात 
 •  राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रयोगांच्या यशोगाथा 
 •  कृषी रसायन पुस्तक, कृषी शिक्षण, कोरोना व्हायरस, पशुखाद्य सल्ला, मार्केट सल्ला, मार्केट ट्रेड, मार्केट बुलेटिन आदी एका क्‍लिकवर

  या प्रश्नावर अजित पवार म्‍हणाले, सातारकरांबद्दल आम्‍हाला अभिमानच... 

  शरद पवारांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले 'हे' आश्‍वासन