
राज्यमंत्री विश्वजित कदम नाराज
कऱ्हाड (जि. सातारा) : अॅड उदयसिंह पाटील-उंडाळकर (udaysinh undalkar) कऱ्हाड दक्षिणेतील काँग्रेसचे (congress) नेते आहेत. त्यांच्याविषयी आदर आहे. मात्र, कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत (krishna sugar factory election) त्यांच्या गटाने संस्थापक पॅनेलला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय खेदाचा आहे. तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे, असे मत सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम (vishwajeet kadam) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. त्याचवेळी ‘कृष्णा’च्या निवडणुकीत पक्षीय पातळीचा काहीही संबंध नाही, असेही मंत्री कदम यांनी स्पष्ट केले. satara-news-vishwajeet kadam-udaysinh-undalkar-krishna-sugar-factory-election
कृष्णा कारखाना निवडणुकीत यशवंतराव मोहिते रयत पॅनेलच्या उमेदवारांची घोषणा व पॅनेलाच उद्देश जाहीर केला. माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, नरेंद्र पाटील, नानासाहेब पाटील यांच्यासह उमेदवारही उपस्थित होते. मंत्री कदम म्हणाले, ‘‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्ते व सभासदांच्या इच्छेखातर कारखान्यात अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांना एकत्रित आणण्यासाठी पुढाकार घेतला. त्या दृष्टीने दोन्ही बाजूंनी प्रामाणिक प्रयत्न झाले. अनेक दिवस चर्चा झाली. त्यात अडथळे होते. दुर्दैवाने त्या प्रयत्नांना यश आले नाही. त्याची काही कारणे आहेत.
कऱ्हाड, वाळवा आणि कडेगाव तालुक्यांवर प्रामुख्याने कारखान्याची निवडणूक आहे. वाळवा तालुक्यात अनेक पक्षांचे नेते, कार्यकर्ते तिन्ही पॅनेलमध्ये आहेत. त्यामुळे सहकारातील निवडणूक पक्षीय स्तरावर नाही. दिवंगत ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते, स्वर्गीय प्रेमलाकाकी चव्हाण, आनंदराव चव्हाण यांचा विचार अधिक रुजविण्यासाठी रयत पॅनेल काँग्रेस विचारांचे पॅनेल असणार आहे.’’

Krishna Factory
कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांच्या भूमिकेविषयी विचारले असता डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले, ‘‘कारखान्यावर प्रेम करणारे मदनदादा निष्ठावान नेते आहेत. मध्यंतरी त्यांनी का निर्णय घेतला, हे माहीत नाही. त्यांच्या व्यक्तिगत कारणांनी त्यांनी ते पाऊल उचलले आहे. आमची भाऊंच्या विचारांवर, तसेच कारखाना, सभासद, कर्मचारी यांच्यावर निष्ठा असून, त्या विचारानेच आपण कार्यरत आहोत.’’ २००९ रोजी मोहिते आणि भोसलेंचे मनोमिलन व्हावे, यासाठी आपण पुढाकार घेतला. मात्र, सध्या तसे दिसत नाही, या प्रश्नावर डॉ. मोहिते म्हणाले, ‘‘त्यासाठी अजूनही आग्रही आहे.
मोहिते व भोसले असे गटावर विचार केंद्रित न होता कारखाना, शेतकरी, ऊसदरावर विचार केंद्रित व्हावा, त्यासाठी ते मनोमिलन होते. दुदैवाने ते झाले नाही. विचारासाठी आम्ही आजही आग्रही आहोत. मात्र ते हात झटकून गेले आहेत. त्याला आम्ही काही करू शकत नाही. जे येतील त्यांना बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.’’