rare fish species found in maharashtra
esakal
गोंदवले (सातारा) : वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी घटत असताना करण्यात आलेल्या विशेष नमुना संकलना दरम्यान किरकसाल परिसरातील बंधाऱ्यांमध्ये डेक्कन महासीर, पश्चिम घाटात स्थानिक व असुरक्षित असलेला कोलूस बार्ब व स्थानिक जलपरिसंस्थेत स्वच्छतादाराची भूमिका बजावणारा पाबडा हा कॅटफिश आढळून (rare fish species in satara reservoirs) आला आहे. परिसरात आतापर्यंत माशांच्या बारा प्रजातींच्या नोंदी झाल्या असून, हंगामी जलसाठे दुर्मीळ जलचरांसाठी अत्यावश्यक ‘सूक्ष्म आश्रयस्थाने’ म्हणून कार्यरत असल्याचे सिद्ध होत आहे.