Satara Politics: कॉंग्रेसला राम राम करून राष्ट्रवादीमध्ये दाखल, रामराजे गटाची ताकद वाढली

रामराजे; ॲड. मेघराज भोईटे यांच्‍या गटाचा काँग्रेसला रामराम
Satara Politics Adv Meghraj Bhoite News
Satara Politics Adv Meghraj Bhoite NewsSAKAL

पिंपोडे बुद्रुक : विधानसभेचे माजी सभापती (कै.) शंकरराव जगताप यांच्याविषयी सर्वांना नेहमीच आदर होता. त्यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राजकारण व समाजकारण केले.

त्यांचे समर्थक अॅड. मेघराज भोईटे यांच्या प्रवेशामुळे उत्तर कोरेगावमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली असून, विकासकामे मार्गी लावण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे आश्वासन आमदार रामराजे नाईक- निंबाळकर यांनी दिले. (Latest Marathi News)

वाघोली (ता. कोरेगाव) येथील अॅड. मेघराज भोईटे यांच्या गटाने रामराजे यांचे नेतृत्व स्वीकारून कॉँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये नुकताच प्रवेश केला.

प्रवेशानंतर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची निवडणूक त्यांनी मोठ्या मताधिक्याने जिंकली. या पार्श्वभूमीवर रामराजे यांनी फलटण येथे नूतन संचालकांचा सत्कार केला. या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांची सध्या सर्वांना गरज आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जातीयवाद भडकावला जातोय. देशभक्तीच्या नावाखाली माणसांची डोकी भडकावली जात असून, येत्या काळात याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. (Marathi Tajya Batmya)

रोजी रोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. बेरोजगारी, महागाईने डोके वर काढले असताना सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. सरकार केवळ उद्योगपती आणि धनाढ्यांना सवलती देत असून, शेतकरी दुर्लक्षित राहिला आहे.’’

Satara Politics Adv Meghraj Bhoite News
Satara News : करोडोची रोल्सरॉईल्स घेण्यापेक्षा कामगारांना अर्थसाह्याचे समाधान

बाजार समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जिंकायची असेल, तर पक्ष संघटना मजबूत करायला हवी. यावेळी हिंदुराव भोईटे, दिलीप पाटील, सुहास भोईटे, सुरेश भोईटे, रमेश भोईटे, धनंजय भोईटे, प्रशांत कोरडे, झाकिर पठाण, तुषार जगताप, मंगेश लाहिगुडे, राहुल पवार, विजय पंडित, सूरज पारधे, चंद्रकांत कांबळे, निखिल मोरे, जावेद पठाण व कार्यकर्ते उपस्थित होते.

Satara Politics Adv Meghraj Bhoite News
Satara News : पंतप्रधानांच्या मन की बातमध्ये कऱ्हाडकर; ९९ व्या कार्यक्रमात कऱ्हाडला थेट लाईव्ह येण्याची मिळाली संधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com