सातारा : कोयना धरण विभागात ; शाळांना तीन दिवसांची सुट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SCHOOL

सातारा : कोयना धरण विभागात ; शाळांना तीन दिवसांची सुट्टी

कोयनानगर/सातारा : येथील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सर्व दूर मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ३४ हजार ४०७ क्युसेक होत असून, धरणातील पाणीसाठ्यात गेल्या २४ तासांत अडीच टीएमसीने वाढ झाली. धरणात सध्या ३२.५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. वाढणाऱ्या पावसामुळे कोयना विभागातील माध्यमिक शाळांना तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, साताऱ्यासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन काही प्रमाणात विस्कळित झाले आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. त्यामुळे कोयना विभागातील जनजीवन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. हवेतील गारव्याने कोयनावासीय गारठले आहेत. धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने दक्षता म्हणून कोयना विभागातील माध्यमिक शाळांना तीन दिवसांची सुटी जाहीर केली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंतच्या गेल्या २४ तासांत धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगरला १७७, नवजाला १९१, तर महाबळेश्वरला १०२ मिलिमीटर पावसाचा नोंद झाली. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या १२ तासांत महाबळेश्‍वर- ७७, नवजा- ७६ व कोयनेला ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली हे. आज दिवसभर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता. धरणात ३२.५० टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाणीपातळी २०८१.०२ फूट झाली आहे.

दरम्यान, सातारा शहर व परिसरासह जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. सातारा, जावळी, वाई, महाबळेश्‍वर, पाटण या तालुक्यांत पावसाचा जोर जास्त आहे. संततधार पावसाने हवेतील गारठाही कमालीचा वाढला आहे.पावसाचा जोर

 • मुंबई, पुण्यात पावसाचा जोर वाढला, धरणे भरू लागली

 • उत्तर महाराष्ट्राला पावसाचा जोरदार तडाखा, नद्यांनाही पूर

 • नाशिक जिल्ह्यात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

 • नंदूरबार येथील नागपूर- सुरत महामार्ग पाण्याखाली गेला

 • आंबेबारा, धनीबारा, विसरवाडी, खोलघर प्रकल्प भरले

 • गोदावरी काठच्या गावांना सावधगिरीचा इशारा

 • पूरस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विदर्भात

 • कोल्हापूर जिल्ह्यात संततधार, पंचगंगेच्या पातळीत वाढ

 • सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणीपातळीमध्येही वाढ

 • कोकणात जोर कायम, सिंधुदुर्गात भात लावणीला वेग

 • नगरमध्ये अतिवृष्टीचा इशारा, मुळा धरण ४० टक्के भरले

जिल्ह्यातील पाऊस

 • जिल्हा प्रशासनाकडून ११ गावांचे स्थलांतर

 • ३२६ कुटुंबातील १३५३ लोकांचा समावेश

 • विंग, नावडी वसाहतीतील घरांची भिंत कोसळली

 • घाटातील दरडी काढण्यास बांधकाम विभागाचे प्रयत्न सुरू

 • कृष्णा, कोयना, केरा नद्यांच्या पातळीत वाढ

 • नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

 • हौशी पर्यटकांची कास परिसरात गर्दी

 • 141 words / 1061 characters

Web Title: Satara Koyna Dam Division Schools Three Days Holiday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top