निवडणुक 'कृष्णा'ची : त्यांच्याकडून नकारात्मक उत्तर आलेले आहे; मोहितेंचे स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Krishna Factory

त्यांच्याकडून नकारात्मक उत्तर आलेले आहे; मोहितेंचे स्पष्टीकरण

कऱ्हाड (जि. सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी (krishna sugar factory) सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अविनाश मोहिते (avinash mohite) व डॉ. इंद्रजित मोहिते (indrajeet mohite) यांच्या एकत्रीकरणासाठी पहाटेपर्यंत बैठक झाली. मात्र, त्या बैठकीतील चर्चेत काहीच अंतिम निर्णय झाला नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) , सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम (vishwajeet kadam) , संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते (avinash mohite) यांच्यात मध्यरात्री, तर त्यानंतर कॉंग्रेसच्या (congress) गटांतर्गत पहाटेपर्यंत चर्चा झाली. मात्र, दोन्ही गटांना एकमेकांचे प्रस्ताव मंजूर नसल्याने दोन्ही गटांत निराशा झाली होती. (satara-krishna-sugar-factory-election-avinash-mohite-indrajeet-mohite-panel-unity-not-finalised)

कृष्णा कारखान्यात दोन्ही मोहित्यांनी एकत्रित यावे, यासाठी कॉंग्रेसकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू होते. चार महिन्यांपासून त्यासाठी आडाखे बांधले जात होते. अलीकडच्या काळात त्या चर्चेत आमदार चव्हाण, मंत्री कदम व ऍड. पाटील-उंडाळकरही सहभागी झाले होते. संस्थापक पॅनेलतर्फे अविनाश मोहिते चर्चा करत होते. कालही दोन्ही मोहित्यांच्या एकत्रीकरणासाठी चर्चा सुरू होती. काल रात्री उशिरा बैठक झाली. त्या बैठकीत आमदार चव्हाण, मंत्री कदम व अविनाश मोहिते सहभागी झाले होते. रात्री उशिरा बैठक झाली. त्यात अविनाश मोहिते यांच्याकडून 13 जागा आपल्यासाठी व डॉ. मोहिते गटासाठी आठ जागांचा प्रस्ताव दिला. त्यावर बरीच चर्चा झाली.

त्याबाबत आमदार चव्हाण, मंत्री कदम यांनीही त्यांची मते व्यक्त करत त्याबाबत डॉ. मोहिते यांच्याशी चर्चा करण्याचे ठरले. त्यामुळे प्रस्ताव दिल्यानंतर अविनाश मोहिते निघून गेले. डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यासोबत रात्री उशिरा बैठक सुरू झाली. त्यात आमदार चव्हाण, मंत्री कदम व डॉ. मोहिते त्यात सहभागी होते. अविनाश मोहिते यांच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्याबाबत एकमत होत नव्हते. पहाटेपर्यंत झालेल्या बैठकीत विविध मुद्‌द्‌यांवर चर्चा झाली. तो प्रस्ताव मान्य होत नसल्याने पहाटे बैठक संपली. मात्र, त्यातून काहीच फलित हाती आले नाही. अखेर विना निर्णयाची बैठक संपली.

Prithviraj-Chavan

Prithviraj-Chavan

रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. त्या बैठकीत संस्थापक पॅनेल म्हणून काही गोष्टी स्पष्टपणे मांडल्या होत्या. त्याबाबत त्यांच्याकडून नकारात्मक उत्तर आलेले आहे. त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन योग्य भूमिका मांडणार आहे असे अविनाश मोहिते (नेते, संस्थापक पॅनेल) यांनी स्पष्ट केले.

चार ते साडेचार महिने आघाडी करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत संक्षिप्तपणे सांगता येणार नाही. येत्या दोन दिवसांत याबाबत पत्रकार परिषद घेऊन बोलू असे डॉ. इंद्रजित मोहिते (नेते, यशवंतराव मोहिते रयत संघर्ष आघाडी) यांनीही नमूद केले.

ब्लाॅग वाचा

टॅग्स :Satara