हा कारखाना करणार तब्बल 12 लाख मेट्रिक टनाचे ऊस गाळप...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने 2020-21 या आगामी वर्षाच्या गळीत हंगामासाठी 12 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. 

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये सन 2020-21 वर्षांच्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, संजय पाटील, धोंडीराम जाधव, अमोल गुरव, दिलीपराव पाटील, ब्रिजराज मोहिते, पांडुरंग होनमाने, सुजित मोरे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, मनोज पाटील, कऱ्हाड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. भोसले म्हणाले, ""शासनाने 15 ऑक्‍टोबरपासून गळीत हंगामास परवानगी दिली आहे. त्यादृष्टीने कृष्णा कारखान्यात ऑफ सिझनमधील यंत्रणा तपासणीची कामे गतीने सुरू आहेत. त्याचबरोबर तोडणी वाहतुकीचे करारही अंतिम टप्प्यात आले आहेत. येणाऱ्या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात उसाची उपलब्धता असेल. त्यामुळे सभासद शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपल्या उसाची नोंद कृष्णा कारखान्याकडे करावी. 

प्रारंभी डॉ. भोसले व उपाध्यक्ष श्री. जगताप यांच्या हस्ते धार्मिक विधी करून रोलरचे पूजन करण्यात आले. त्यानंतर यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. 

या वेळी पी. डी. राक्षे, सुहास घोरपडे, डी. जी. देसाई, प्रतापसिंह नलवडे, गिरीश इस्लामपूरकर, अरुण पाटील, आर. जे. पाटील, रवींद्र देशमुख, नीलेश देशमुख, जी. बी. मोहिते व कामगार उपस्थित होते. 
 

नवदांपत्याच्‍या संसार प्रवासात ‘कोरोना’चा थांबा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara In Krishna Sugar Factory Worship Of The Mill Roller