

Kunbi Certificate Update In Satara Over One Thousand Applications Verified Gazetteer May Bring More Caste Verification Cases
sakal
सातारा : जिल्ह्यात कुणबी दाखला मिळाला म्हणजे प्रक्रिया पूर्ण झाली, असे नाही. त्यापुढील टप्प्यावर जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवणे कष्टाचे ठरत आहे. जिल्ह्यातील जात पडताळणी समितीच्या कार्यालयाकडे आतापर्यंत १,७५५ कुणबी दाखलाधारकांनी जात पडताळणीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १,०१२ जणांना कायदेशीर प्रक्रियेनंतर पडताळणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. दरम्यान, मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांचे सध्या सातारा व औंध गॅझेटिअर लागू होण्यासाठी उपोषण सुरू आहे. सातारा गॅझेटिअर लागू झाल्यास जिल्ह्यात कुणबी दाखले व जात पडताळणीची प्रकरणे आणखी वाढणार आहेत.