esakal | कोयनानगर : भूस्खलनग्रस्तांना आज खोल्यांच्या चाव्या मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

कोयनानगर :भूस्खलनग्रस्तांना आज खोल्यांच्या चाव्या मिळणार

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर : 22 जुलै रोजी भूसल्खनामध्ये शापित होवुन उद्ध्वस्त झालेल्या कोयना विभागातील मिरगाव ,ढोकावळे ,हुंबरळी या गावातील आपत्तीग्रस्तांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी कोयनानगर येथे बनविण्यात आलेल्या 150 निवारागृहात आपत्तीग्रस्तांना खोल्या देवून त्यांचे तात्पुरते पुनर्वसनाचा दुसरा टप्पा 8 ऑक्टोबर रोजी पार पडत आहे.आपत्तीग्रस्तांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी कोयनानगर येथे उभारण्यात आलेल्या १५० खोल्यांच्या निवारागृहात आपत्तीग्रस्तांना सन्मानाने प्रवेश प्रक्रिया ८ ऑक्टो रोजी पार पडत आहे.

२२ जुलै रोजी कोयना विभागात झालेल्या ढगफुटी सदृश पाऊसाने विभागातील मिरगाव ,ढोकावळे ,हुंबरळी या गावांवर भूसल्खनन होवुन आपत्तीचा डोंगर कोसळला होता. मिरगाव येथील ११ ढोकावळे येथील ६ तर हुंबरळी येथील १ यामध्ये जमीनदोस्त होवुन गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. या आपत्तीग्रस्त गावातील ग्रामस्थांचे तीन टप्प्यात पुनर्वसन करण्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपत्तीग्रस्त गावानां कोयनानगर येथील मराठी व हायस्कूल येथे तर ढोकावळे येथील ग्रामस्थांना न्यु इंग्लिश स्कुल चाफेर-मिरगाव येथे स्थलांतरीत केले होते. या सर्व आपत्तीग्रस्त ग्रामस्थांना कोयनानगर येथील १५० खोल्या मध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्याचे जाहिर केले होते.

हेही वाचा: झेन टेक्नॉलॉजीच्या शेअर्समध्ये 1 महिन्यात 159 टक्क्यांची वाढ...

दोन महिन्यात १५० खोल्या उभारुन या खोल्या मध्ये या तिन्ही गावातील आपत्तीग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन ८ ऑक्टो रोजी करण्यात येणार आहे. आपत्ती ग्रस्तांना सन्मानाने या खोल्यांत घालविण्यासाठी खोल्यांच्या चाव्या देण्यासाठी

स्वतः राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई सो ,जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री. जयवंतराव शेलार, प्रांताधिकारी सुनील गाढे हे येणार आहेत.

loading image
go to top