

Application Drive Begins: NCP Ahead, BJP Plays Cautious in Satara
Sakal
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगूल आज वाजला आहे. ६५ गट व १३० गणांसाठी येत्या सोमवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आतापर्यंत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी इच्छुकांकडून अर्ज मागवून घेत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे भाजपने सावध खेळी खेळत इच्छुकांकडून त्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेची गुरुवारी होणाऱ्या बैठकीत रणनीती ठरणार आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष मात्र उमेदवारांची चाचपणी करत असल्याचे चित्र आहे.