esakal | Satara: लोणंदमध्ये सुरक्षा रक्षकास मारहाण करून दीड लाखाची चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लोणंदमध्ये सुरक्षा रक्षकास मारहाण करून दीड लाखाची चोरी

sakal_logo
By
रमेश धायगुडे, लोणंद.

लोणंद (सातारा) : लोणंद एमआयडीसीतील स्पार्क कंपनीच्या तीन सिक्युरिटी गार्डना तीन ते चार अनोळखी चोरट्यांनी पाइप व दांडक्याने मारहाण करून सुमारे दीड लाख रुपयाची ९०० मीटर कॉपर वायर चोरून नेली.

लोणंद पोलिसांनी सांगितले, की मंगळवारी रात्री ११.३० ते (ता. ६) रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान लोणंद येथील एमआयडीसीतील स्पार्क ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये अनोळखी ३ ते ४ जणांनी कंपनीचे कंपाउंडवरून आत प्रवेश करून कंपनीचे सिक्युरिटी गार्ड गणेश सावता क्षीरसागर, अमोल सुखदेव धायगुडे, अजय नाना धुरगुडे यांना पाइपने व लाकडी दांडक्याने मारहाण करून आरमान कंपनीचे प्लॅस्टिकचे काळे आवरण असलेले त्याच्या आतमध्ये कॉपर वायर असलेली केबल अंदाजे ९०० मीटर लांबीची दीड लाख रुपये किमतीची केबल असा दीड लाखाचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

हेही वाचा: Video: दौंड येथे इमारतीच्या छतावर कोसळली वीज

याबाबत लोणंद पोलिस ठाण्यात सिक्युरिटी सर्व्हिसचे आकाश छत्री (रा. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, लोणंद पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण विभागाचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश माने हे अधिक तपास करत आहेत.

loading image
go to top