
लोणंद (जि. सातारा) : नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सचिन शेळके- पाटील यांच्या विरुद्ध एकूण 17 पैकी 13 नगरसेवकांनी एकत्र येऊन दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी सोमवार (ता. 22) दुपारी 12 वाजता लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले- राजापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलावण्यात आली आहे.
नगराध्यक्ष श्री. शेळके यांच्याविरुद्ध 17 पैकी 13 नगरसेवकांनी 12 जून 2020 रोजी ते नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहेत. प्रत्येक महिन्याला सर्वसाधारण सभा बोलावणे कायद्याने बंधनकारक असताना जाणीवपूर्वक ही सभा बोलावत नसल्यामुळे नगरपंचायतीचे दैनंदिन कामकाज वेळच्या वेळी होत नाही आदी कारणे देत जिल्हाधिकाऱ्यांकडे तसे सह्यांचे पत्र देऊन अविश्वास ठराव दाखल केला आहे. या अविश्वास ठरावावर नगरसेवक हणमंतराव शेळके-पाटील, विकास केदारी, शैलजा खरात, हेमलता कर्नवर, राजेंद्र डोईफोडे, कृष्णाबाई रासकर, किरण पवार, स्वाती भंडलकर, ऍड. पुरुषोत्तम हिंगमिरे, लक्ष्मणराव शेळके- पाटील, लीलाबाई जाधव, योगेश क्षीरसागर, दीपाली क्षीरसागर या 13 कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या नगरसेवकांनी सह्या केल्या आहेत. या वेळी आमदार मकरंद पाटील उपस्थित होते.
नगराध्यक्ष श्री. शेळके हे सुरुवातीला अपक्ष निवडून आले आहेत. त्यानंतर राष्टवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून ते नगराध्यक्ष झाले, तर काही महिन्यांपूर्वी त्यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या विशेष सभेत त्यांच्या विरोधातातील अविश्वास ठराव मंजूर होणार का? फेटाळला जाणार? याकडे संपूर्ण लोणंदकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सह्या करणाऱ्या 13 पैकी 12 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.
मटका अड्यावर छापा; साताऱ्यातील महिला ताब्यात, एक लाख 95 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.