Man Khatav Phaltan transport hub project
esakal
सातारा : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या माण, खटाव आणि फलटण या तालुक्यांच्या विकासाला आता मोठी गती मिळण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’ आणि राज्य सरकारच्या ‘शक्तिपीठ महामार्गा’मुळे या भागाचा चेहरामोहरा (Shaktipeeth Highway development in Maharashtra) बदलणार असून, भविष्यात हे तालुके राज्यातील महत्त्वाचे ‘ट्रान्सपोर्ट हब’ म्हणून उदयास येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.