
राष्ट्रवादीच्या माजी आमदारास अटक; पाेलीस काेठडीत रवाना
सातारा : पडळ (ता. खटाव) येथील साखर कारखान्यातील अधिकारी जगदीप थाेरात यांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी आमदार व कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे (prabhakar ghrage) यांना वडूज न्यायालयाने शनिवारपर्यंत (ता.15) पाेलीस काेठडीत ठेवण्याचा आदेश बजावला आहे. satara marathi news crime police arrested former ncp mla prabhakar gharge
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडळ येथील खुनाच्या तपासासाठी वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणी सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील संशयित प्रभाकर देवबा घार्गे (रा. पळशी, ता. खटाव) यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाने ते 29 एप्रिल रोजी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत (ता. 6) दिलासा देऊन शुक्रवारीपर्यंत (ता. 7) न्यायालयात समक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यावर श्री. घार्गे यांनी न्यायालयात समक्ष हजर न राहता मुदतवाढीचा अर्ज दाखल केला. तो अर्ज न्यायालयाने नामंजूर करून त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले हाेते.
हेही वाचा: प्रभाकर घार्गे, मनोज घोरपडे, संग्राम घोरपडेंसह 20 जणांवर खुनाचा गुन्हा
मंगळवारी वडूज पाेलिसांनी त्यांना साता-यात ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने घार्गे यांना 15 मे पर्यंत पाेलीस काेठडी बजावली आहे अशी माहिती स्थानिक पाेलिस ठाण्यातून देण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा
हेही वाचा: वाढत्या रुग्ण संख्येत केंद्राच्या यादीत पुन्हा महाराष्ट्र
Web Title: Satara Marathi News Crime Police Arrested Former Ncp Mla Prabhakar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..