
रेमडेसिव्हिरप्रकरणी सावंत दांपत्यावर गुन्हा
सातारा : मूळ किमतीपेक्षा जादा दराने विक्रीसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन (remdesivir injection) घेऊन जाणाऱ्या दांपत्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत. (satara marathi news crime remdesivir police arrested couple)
जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक विजय कुंभार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, सहायक पोलिस निरीक्षक प्रताप भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली. समर्थ मंदिर परिसरात त्यांनी प्रशांत दिनकर सावंत (वय 29) व सपना प्रशांत सावंत (वय 25, दोघे रा. मंगळवार पेठ) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रेमडेसिव्हिरची दोन इंजेक्शन आढळून आली.
हेही वाचा: राष्ट्रवादीच्या माजी आमदारास अटक; पाेलीस काेठडीत रवाना
अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त अरुण गोडसे यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन इंजेक्शन व दुचाकी असा 21 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रताप भोसले, हवालदार सागर भोसले, जयवंत खांडके, अश्विनी बनसोडे, तेजल कदम, सुमित मोरे, नीलेश बच्छाव, अनिकेत अहिवळे, राहुल वायदंडे या कारवाईत सहभागी झाले होते.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा
Web Title: Satara Marathi News Crime Remdesivir Police Arrested
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..